Akshargranth
Manasamjhavan by Sangram Gaikwad मनसमझावन - संग्राम गायकवाड
Manasamjhavan by Sangram Gaikwad मनसमझावन - संग्राम गायकवाड
Couldn't load pickup availability
Manasamjhavan मनसमझावन by Sangram gaikwad संग्राम गायकवाड
अस्वस्थ करणारी कादंबरी
भारतीय राजस्व सेवेत कार्यरत असणाऱ्या संग्राम गायकवाड यांची ‘मनसमझावन’ ही दुसरी कादंबरी. ‘आटपाट देशातल्या गोष्टी’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीनंतर आलेली ‘मनसमझावन’ ही वेगळया विषयावरची आणि अभिव्यक्तीमध्येसुद्धा वेगळं तंत्र आजमावणारी कादंबरी.
या अनेकपदरी कथेचं कथानक चिन्मय, त्याचे आई-वडील, मैत्रीण, सामाजिक कार्यकर्ते अशा व्यक्तीपासून लालबाबाचा दर्गा, त्याचा शेजारचा म्हसोबा, दखनी भाषा यांनी वेगवेगळ्या कोनांतून केलेल्या कथनांद्वारे उलगडत जातं. ट्विटरवरचं चिन्मयचं अकाऊंट, व्हॉट्सअॅप, ‘लोकमत’ इतकेच नव्हे, तर कारसेवेसाठी बाभूळगावातून गेलेली एक वीट हेदेखील आपापल्या कथनांमधून स्वतःचं अंतर्विश्व उघड करतात.
एक रहस्यकथा सांगता सांगता भोवतालच्या गुंतागुंतीच्या सामाजिक परिस्थितीची उकल करण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते.
Sangram gaikwad | Rohan Prakashan |
Share
