Akshargranth
Manus Asa Ka Vagato by Anjali Chipalkatti माणूस असा का वागतो
Manus Asa Ka Vagato by Anjali Chipalkatti माणूस असा का वागतो
Couldn't load pickup availability
Manus Asa Ka Vagato by Anjali Chipalkatti माणूस असा का वागतो
लेखक - अंजली चिपलकट्टी
प्रकाशन - राजहंस प्रकाशन
ISBN - 978-93-95483-86-5 | पहिली आवृत्ती - सप्टेंबर २०२३ | पृष्ठ संख्या - ४३०| वजन - ५२८
नैतिकता अन् सामाजिक विषमता, धर्मभावना आणि आध्यात्मिकता, प्रेम अन् लैंगिकता, आक्रमकता अन् भय, अनुपालन, धर्म-जात भेदाभेद, कल्पनाविश्व अन् साहित्य-कला-क्रीडा... माणसाच्या वर्तनाचे असे अनेकविध पैलू. उत्क्रांतिशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, जेनेटिक्स, मेंदूविज्ञान, मानसविज्ञान, प्राणीवर्तनविज्ञान अशा विविध ज्ञानशाखांच्या मिलाफातून माणसाच्या वर्तनाचा अभ्यास चालू आहे. स्वत:चे सांस्कृतिक पर्यावरण घडवण्याची क्षमता असलेला एकमेव प्राणी म्हणजे माणूस. सहकार्य, परोपकार, साहचर्य हे गुण माणसाच्या उत्क्रांतीत महत्त्वाचे ठरले आहेत. माणसांना एकमेकांशी बांधणारी तत्वं माणसाच्या वर्तनात उत्क्रांतीनेच पेरली आहेत का ? मानवी वर्तनाला विधायक वळण देण्याची अंगभूत क्षमता माणसातच आहे का ? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारे - आजच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थितीशी नानाविध ज्ञानशाखांच्या एकात्मिक अभ्यासाचा संबंध जोडत माणसाच्या व्यक्तिगत अन् सामूहिक वर्तनाचा वैज्ञानिक वेध घेणारे – माणूस असा का वागतो
Anjali ChipalkattiRajhans Prakashan |
Share
