Skip to product information
1 of 1

Akshargranth

Manus Asnyachya Aathavani

Manus Asnyachya Aathavani

Regular price Rs. 405.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 405.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Manus Asnyachya Aathavani माणूस असण्याच्या आठवणी - Devi Prasad Mishra, Ganesh Vispute

नवीन जोडे विकत घ्यायला गेलेला, आणि किमती ऐकल्यावर हबकून चपलाही विकत न घेता परत फिरणारा माणूस, देहविक्रय करणाऱ्या स्त्रीसोबत तिला थकवणारा देहव्यापार केल्यानंतर, तिच्या पाठीवरच्या डागामुळे पैसे नाकारणारा माणूस, अगतिक, विफल, दयाळू ते कुटिल, हिंस्र, क्रूर अशी माणूसपणाची विविध चित्रं देवी प्रसाद मिश्र या छोट्या छोट्या कथांतून उभी करतात. मूलतः कवी असलेल्या देवी प्रसादांनी हा लहान कथांचा फॉर्म निवडताना, ज्याला त्यांनी 'अन्य कथा' असं नाव दिलं आहे, आपली कविता हरपू दिलेली नाही. त्यामुळे इथे समुद्राच्या आसपास स्वतःच्या आतला समुद्र घेऊन फिरणारी स्त्री भेटते, ज्याला नेहमी हवा व्हायचं होतं असा वृद्ध भेटतो आणि ऋत्विक घटकची 'सुवर्णरेखा' जिथे चालू असेल, अशा ठिकाणी उतरवा असं बस कंडक्टरला सांगणारा माणूस भेटतो.
पण या साऱ्यातून देवी प्रसाद आपल्या समोर आणू पाहतायत तो आहे, 'एक भयंकर दुसऱ्या भयंकराची जागा घेतंय' अशा स्वरूपाचा समकाल. परिघावर राहणाऱ्या, हरलेल्या, उपेक्षित माणसांच्या जगण्याच्या या 'मंत्र पुटपुटाव्या' तशा सांगितलेल्या कथा तुम्हाला भारून टाकतील.
- जयप्रकाश सावंत

Papyrus Prakashan |

View full details