Akshargranth
Mayamba Te Mumbai By Pra. Dr. Shivaji Ghungarad मायंबा ते मुंबई (आत्मकथन)
Mayamba Te Mumbai By Pra. Dr. Shivaji Ghungarad मायंबा ते मुंबई (आत्मकथन)
Couldn't load pickup availability
प्राचार्य डॉ. शिवाजी घुंगरड यांनी 'उद्धरावा स्वयें आत्मा' या उक्तीप्रमाणे स्वतःला घडवत, कुटुंबाला सावरत, हजारो विद्यार्थ्यांना सक्षम घडवत 'निमगाव ते मुंबई' पर्यंतच्या केलेल्या संघर्षाचा जीवनप्रवास अचंबित करणारा आहे. त्यांच्या या संघर्षात स्वत्व, सत्त्व, तत्त्व व ऊर्जा आहे.
त्यांनी आपल्या अनुभवविश्वाच्या कार्यकक्षा वर्तुळाकार विस्तारीत करून विविध क्षेत्रांत केलेल्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा आपल्या आत्मकथनात मांडला आहे. प्राचार्य डॉ. शिवाजी घुंगरड यांनी आत्त्मकथनाच्या माध्यमातून आपला इतिहास सहज, सोप्या भाषेत लिहून पुढच्या पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा दिला आहे.
हे आत्मकथन वाचताना प्रत्येकाला ते स्वतःचे वाटावे इतके जिवंत अनुभव त्यात नोंदवले आहेत. त्यामुळे या साहित्यकृतीने प्राचार्य डॉ. शिवाजी घुंगरड यांच्यातील प्रतिभासंपन्न लेखक, विचारवंत व द्रष्टा सामाजिक कार्यकर्ता वाचकांना उमगेल यात शंकाच नाही. प्राचार्य डॉ. शिवाजी घुंगरड यांची 'मायंबा ते मुंबई' ही साहित्यकृती सर्वांना प्रेरणा देणारी यशोगाथा आहे.
Share
