Skip to product information
1 of 1

Akshargranth

Mayna मायना by Rajeev Naik, राजीव नाईक

Mayna मायना by Rajeev Naik, राजीव नाईक

Regular price Rs. 205.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 205.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Mayna मायना by Rajeev Naik, राजीव नाईक

"मायना" हा राजीव नाईक यांचा 'कविताबिविता' नंतरचा दुसरा कवितासंग्रह. अन्य कोणालातरी उद्देशून वा स्वत:ला उद्देशून लिहिलेल्या, आणि अनेकस्तरीय अर्थ प्रकट करणाऱ्या, अशा दुहेरीपणे या कविता 'मायनेदार' आहेत. खास भाषा आणि अनुभवाच्या आविष्काराची अनोखी शैली यांच्या संयोगातून राजीव नाईक यांच्या कवितेने आकार घेतला आहे. या कवितेच्या वैशिष्ट्यपूर्ण घाटातून उद्‌भवणारे आशयाचे तरंग वाचकाच्या बौद्धिक जाणिवांचा आणि भावसंवेदनाचा पैस विस्तारत नेतात; आंतरिक आणि बाह्य संवेदन विश्वातले अंतर मिटवून आजच्या मानवी समस्याग्रस्त अस्तित्वाचा समग्र अनुभव देतात. समकालीन मराठी कवितेत राजीव नाईक यांचा हा 'मायना' लख्खपणे निराळा ठरतो. - नीतीन रिंढे मुखपृष्ठ: गणेश विसपुते

Rajeev Naik | Papyrus Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback |

View full details