1
/
of
1
Akshargranth
Menduchi Mashagat by Deva Zinjad मेंदूची मशागत
Menduchi Mashagat by Deva Zinjad मेंदूची मशागत
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Menduchi Mashagat by Deva Zinjad मेंदूची मशागत - देवा झिंजाड
ह्या पुस्तकाचा उद्देश हा फक्त अवघड अन विशेषतः परदेशी आदर्श डोळ्यासमोर ठेवत अवास्तव सल्ले देऊन किंवा परदेशी लेखकांचे लेखन अनुवादित करून माणसांच्या मेंदूला बोजड करण्याचा विचार माझ्या मनात अजिबात नव्हता, तर मी जे काही अनुभवलं, ज्या गोष्टींनी मला झपाटून टाकलं, जे काही आजूबाजूला हेलावून टाकणारं पाहिलं, जे जे काही बोचलं त्या सगळ्यातून निघणाऱ्या निष्कर्षातून माणसाला काहीतरी शिकायला मिळू शकेल असं मला ठामपणे वाटत होतं.
म्हणूनच नेमक्या त्याच गोष्टींचं ‘कसदार बियाणं पुस्तकाच्या पाभारीतून आपल्यासमोर पेरायचं मी ठरवलं.’
असे काही महत्वाचे अनुभव जर आपण एकाच पुस्तकात एकत्र केले तर त्या वेगवेगळ्या अनुभवांतून माणसांच्या ‘मेंदूची मशागत’ नक्कीच होईल ह्यावर माझा विश्वास होता.
अन ह्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ‘एक भाकर तीन चुली’ ही कादंबरी वाचल्यामुळे जर एक चोवीस वर्षाची मुलगी आत्मह्त्तेच्या टोकावरून मागं फिरून ‘रडायचं नाही लढायचं’ असा निर्णय घेऊन नव्या दमानं पुन्हा जगायला सुरुवात करत असेल. अशी अनेक उदाहरणं आहेत.
BOOK YOUR COPY NOW !
एकूणच आपल्या लिखाणामुळे मेंदूची मशागत होऊन अनेकांना शाश्वत प्रेरणा मिळत असेल तर मग अशाच प्रकारच्या घटनांवरचं एखादं पुस्तक लिहावं अन खचलेल्या, मरगळलेल्या मनांना उभारी देता आली तर जरूर द्यावी असं मला वाटलं.
त्यातूनच मेंदूची मशागत हे पुस्तक आकाराला आलं.
New Era Publishing House |
Share
