Akshargranth
Mission Semiconductors - मिशन सेमीकंडक्टर्स - डॉ. माधवी ठाकूरदेसाई
Mission Semiconductors - मिशन सेमीकंडक्टर्स - डॉ. माधवी ठाकूरदेसाई
Mission Semiconductors by Dr Madhavi Thakurdesai - मिशन सेमीकंडक्टर्स - डॉ. माधवी ठाकूरदेसाई
‘सेमीकंडक्टर्स’ हे आजच्या सर्वप्रकारच्या तंत्रज्ञानाचा पाया आहेत. आपलं दैनंदिन जीवन सुखकारक करणाऱ्या सेमीकंडक्टर मायक्रोचिप, एलईडी, लेझर, निरनिराळे डिटेक्टर्स, ॲक्च्युएटर्स अशा अनेक वस्तू ‘सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी’ वापरून बनवल्या जातात. अमेरिकेतल्या सुप्रसिद्ध सिलिकॉन व्हॅलीत सुरू झालेला हा ‘सेमीकंडक्टर उद्योग’ बघता बघता जगभर पसरला. आज एखादी सेमीकंडक्टर मायक्रोचिप बनवायची असेल तर त्यात जवळपास पंचवीस देश सामील असतात. त्यामुळे कोणत्याही एका देशाला ‘सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी’वर वर्चस्व मिळवणं सहजसाध्य नाही. तरीही जगातले सगळे प्रमुख देश ‘सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी’मध्ये स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करत आहेत कारण जगावर राज्य करण्याची ही एक गुरुकिल्ली आहे.