Akshargranth
Muktarth मुक्तार्थ
Muktarth मुक्तार्थ
Couldn't load pickup availability
Muktarth by Nitin Rindhe | मुक्तार्थ साहित्य आणि संकृती यांच्या दरम्यान | लेखक - नीतीन रिंढे
लेखकाचं साहित्य, त्यामागं असलेलं त्या लेखकाचं चरित्र अन् या दोहोंच्याच मागं नव्हे, तर एकंदर साहित्यव्यवहारामागं असलेलं सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण अशा तीनही प्रतलांना स्पर्शणारे साहित्यविषयक लेख ‘मुक्तार्थ’ मध्ये वाचायला मिळतात. साहित्याची निर्मिती, आस्वाद आणि प्रत्यक्ष साहित्य यांना सांस्कृतिक अंगाने भिडणारे हे लेख आहेत. लेखकांची भौतिक चरित्रं आणि त्यांची कल्पनाशक्ती, साहित्याच्या निर्मितीची भौतिक साधनं आणि तात्त्विक आयुधं, वाङ्मयीन क्षेत्रांतल्या घडामोडी आणि जाणीवपूर्वक आकाराला आलेल्या वाङ्मयीन चळवळी या सर्वांमधले आंतरिक संदर्भ तपासत साहित्याकडं संस्कृती-अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न ‘मुक्तार्थ’ मधल्या लेखांतून केला आहे.
‘मुक्तार्थ’ मधल्या लेखांतून इंग्रज वसाहतकाळातल्या साहित्यव्यवहारापासून, साठोत्तर काळातल्या साहित्यचळवळींपर्यंत अनेक दुर्लक्षित जागांना उजाळा मिळाला आहे.
Rohan Prakashan |
Share
