Skip to product information
1 of 1

Akshargranth

Nagpurkar Bhosale Ani Gadha Mandala नागपूरकर भोसले आणि गढा-मंडला

Nagpurkar Bhosale Ani Gadha Mandala नागपूरकर भोसले आणि गढा-मंडला

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Nagpurkar Bhosale Ani Gadha Mandala by Dr Govind Tirmanvar गढा-मंडला Gadha Mandala by नागपूरकर भोसले - पेशवे संघर्षाचा दुर्लक्षित इतिहास

Nagpurkar Bhosale Ani Gadha Mandala नागपूरकर भोसले आणि  गढा-मंडला  by डॉ गोविंद तिरमनवार 

"
परस्पर सहकार्याने मराठा राज्याचे संवर्धन व संरक्षण करण्याऐवजी खासगी वतने व सरंजामासाठी मराठा सरदार परस्पर शस्त्र उपसण्यास सिध्द झाल्याची जी अनेक खेदजनक उदाहरणे मराठा इतिहासात आढळतात, त्यातील गढा-मंडलासाठी झालेला भोसले-पेशवे संघर्ष हा एक होय. गोंंड राजाकडून नागपूरचा अधिकार थोरले रघुजी भोसले यांनी मिळविल्यानंतर या राज्याच्या सीमा विस्तारण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी रघुजीने केली. नागपूर राज्याच्या सीमा विस्तारण्याच्या प्रक्रियेत असतानाच थोरले रघुजी भोसले यांचे लक्ष मध्य भारतातील गढा-मंडला या गोंड राज्याकडे गेले आणि गढा-मंडला मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षेतून त्याचे मराठा संघाचा प्रमुख पेशवा बाजीराव पहिला याच्यांशी संघर्ष सुरु झाला.

गढा-मंडलाचा प्रश्न थोरले रघुजी भोसले व पेशवा पहिला बाजीरावाने आणि पुढे त्यांच्या उत्तराधिकार्‍यांनी प्रतिष्ठेचा बनविल्यामुळे भोसल-पेशवे संघर्ष मराठा राज्यासाठी घातक ठरला. भोसले-पशवे हे दोघे मराठा संघाचे प्रमुख आधारस्तंभ होते. या दोघांनी प्रामाणिकपणे मराठा संघाला आधार देऊन त्याला मजबूत करणे आवयक असूनही गढा-मंडला राज्याच्या प्राप्तीसाठी या दोन आधारस्तंभांनी आपल्या खर्‍या जबाबदारीकडे पाठ फिरवून त्यांनी एकमेकांविरुध्द दंड थोपाटले. गढा-मंडलाची प्राप्ती हा मुद्दा दोघांनीही प्रतिष्ठेचा बनविला. त्यातून अनेक चांगल्या-वाईट गोष्टी घडून आल्या. ज्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम मराठा राज्यावर झाले.
A book on history of Gadha-Mandala and the conflict between the Nagpurkar Bhosale's and the Peshwas for the control of Gadha Mandala. Prof. Dr. Govind Tirmanwar has brough into focus this little known chapter of Maratha History through his detailed research. This is great resource for readers interested in Maratha History. "

View full details