Skip to product information
1 of 1

Akshargranth

Nivadak Balmitra Suras Vyaktichitra by B R Bhagwat निवडक बालमित्र सुरस व्यक्तिचित्र - भा रा भागवत

Nivadak Balmitra Suras Vyaktichitra by B R Bhagwat निवडक बालमित्र सुरस व्यक्तिचित्र - भा रा भागवत

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Nivadak Balmitra Suras Vyaktichitra by B R Bhagwat  निवडक बालमित्र सुरस व्यक्तिचित्र - भा रा भागवत

लहानग्यांच्या विश्वात भा. रा. भागवत हे नाव प्रसिद्ध आहे. ‘फास्टर फेणे’ हा त्यांच्या लेखणीतून उतरलेला खट्याळ पोरगा अजूनही ‘कल्ला’ करतो आहे! पण या फास्टर फेणेच्याही आधी (१९५१ ते १९५७) भा.रां.नी ‘बालमित्र’ नावाचं ‘छोट्या-मोठ्या मुलांचं छानदार मासिक’ चालवलं होतं. बालमित्रमध्ये काय नाही! विज्ञान, साहस, कविता, थोरामोठ्यांच्या आयुष्यातल्या रंजक गोष्टी... असा सगळा खजिना आहे. पण हा खजिना आजही अजिबात ‘बोअरिंग’ नाही. सिंदबादच्या सफरींसारखा तो उत्सुकतेने जीव मुठीत धरून कधी नवीन गूढ प्रदेशांमध्ये फिरवून आणतो, तर कधी धाडसाने चोर-पोलीस खेळायला लावतो. कधी फजिती करकरू पोट धरून लोळवतो, तर कधी जुन्यापान्या लोककथा सांगून पुंगीवाल्यागत खूळ लावून आपल्यापाठी ओढत घेऊन जातो... आणि मध्येच एखादा चिमटा काढून भानावरही आणतो! ‘बालमित्र’मधल्या या निवडक कथा आणि व्यक्तिचित्रं आजही पोरांना आणि त्यांना वाचून दाखवणार्‍या थोरांनाही रंगवून टाकतील, याबाबत शंका नाही

B R Bhagwat | Diamond Publications | Latest edition | Marathi | Paperback | Pages 206 |

View full details