Akshargranth
OK Sorry Thank You ओके सॉरी थँक यु - प्रफुल्ल वानखेडे आणि कार्टुनिस्ट आलोक
OK Sorry Thank You ओके सॉरी थँक यु - प्रफुल्ल वानखेडे आणि कार्टुनिस्ट आलोक
Couldn't load pickup availability
OK Sorry Thank You by Prafulla Wankhede , Alok ओके सॉरी थँक यु - प्रफुल्ल वानखेडे आणि कार्टुनिस्ट आलोक , Prafulla Wankhede, Alok Nirantar
'ओके' 'सॉरी' 'थँक यू' या पुस्तकात "गोष्ट पैशापाण्याची"चे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांचे विचार आणि प्रसिद्ध कार्टुनिस्ट आलोक निरंतर यांची चित्रे गोष्टीरूपात मांडण्यात आली आहेत.
'ओके' 'सॉरी' 'थँक यू' या पुस्तकात "गोष्ट पैशापाण्याची"चे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांचे विचार आणि प्रसिद्ध कार्टुनिस्ट आलोक निरंतर यांची चित्रे गोष्टीरूपात मांडण्यात आली आहेत.
दोन अनोळखी माणसांची रस्त्यावर होणारी सहज भेट आणि त्यातून पुढे जाणारी गोष्ट हलक्या-फुलक्या शैलीत वाचकांसमोर उभी राहते.
जगण्यातल्या शाश्वत मूल्यांचा गप्पांच्या माध्यमातून, खुमासदार आणि विनोदी पद्धतीने उहापोह करण्यात आला आहे.
आजची सामाजिक परिस्थिती, करिअर, आर्थिक नियोजन आणि साक्षरता, वाचनाचे महत्त्व, नैतिकता, सुख आणि दुःख यांसारख्या विविध विषयांवरच्या विधायक गप्पा सोप्या भाषेत आणि आकर्षक चित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे.
एक उद्योजक, एक पत्रकार, एक अनुभवी तरी मिश्किल आजोबा आणि एक होतकरू तरुणी या चार पात्रांच्या माध्यमातून सकारात्मक संदेश अतिशय सोप्या, वाचनीय आणि आकर्षक शैलीत देण्यात आला आहे.
sakal Prakashan2024
Share