Skip to product information
1 of 1

Akshargranth

Paliche Politics By Aishwarya Revadkar पाळीचं पॉलिटिक्स

Paliche Politics By Aishwarya Revadkar पाळीचं पॉलिटिक्स

Regular price Rs. 179.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 179.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Paliche Politics By Aishwarya Revadkar पाळीचं पॉलिटिक्स - डॉ. ऐश्वर्या रेवडकर

डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी 'पाळीचं पॉलिटिक्स'मधून पाळीसोबतच स्त्री-पुरुष संबंधातले भावनिक मानसिक शारीरिक अंतःस्तर, त्यातून उद्भवणारं सर्वस्तरीय आरोग्य-अनारोग्य या सगळ्या विषयांना हात घातलेला आहे. ऐश्वर्या यांच्या लेखनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या या विषयासंबंधित केवळ शास्त्रीय भाषेतली माहिती देत नाहीत, तर या लेखनातून त्या वाचकांशी गप्पा मारतायत, अशी त्यांची लेखनशैली आहे. त्या 'प्रतिपादन' करत नाहीत, तर त्या वाचकांना 'समजावून सांगत' राहतात. त्यामुळं एरवी कदाचित रूक्ष किंवा अनाकलनीय वाटेल, अशी माहिती सामान्य वाचकांना केवळ समजतेच असं नाही, तर ती त्यांच्या आत मूलभूत मानवी संवेदनही जागवत राहते. मला वाटतं, ही अनेक अर्थानी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, हे 'पॉलिटिक्स' आणि त्यानुषंगानं या पुस्तकात आलेलं कथन सर्वच स्त्री-पुरुषांनी वाचणं आवश्यक आहे. - बालाजी सुता

View full details