Skip to product information
1 of 1

Akshargranth

Panchtantratil Nitishastra | CA. Milind Shridhar Bhave

Panchtantratil Nitishastra | CA. Milind Shridhar Bhave

Regular price Rs. 235.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 235.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

पंचतंत्रातील नीतिशास्त्र । सीए. मिलिंद श्रीधर भावे

पंचतंत्र या केवळ मुलांच्या गोष्टी नाहीत, तर त्यात नीती आणि धोरणं.

या विषयांच्या तत्त्वांचा उहापोह केला आहे. ही तत्त्वे आपल्या व्यक्तिगत

जीवनात तसेच सार्वजनिक जीवनातही उपयोगी ठरणारी आहेत. मुख्य

म्हणजे या तत्त्वांच्या आधारे आपण सभोवतालचं समाजकारण, अर्थकारण,

राजकारण, सांस्कृतिक बदल चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. योग्य

निर्णय घेण्यासाठीही या तत्त्वांचा वापर आपल्याला करता येतो. आणि हे

सारं काही संस्कृत श्लोकांचा आधार घेत पक्षी-प्राण्यांचा रुपकात्मक

वापर करून गोष्टीरुपाने सांगितलं आहे.

आपलं आयुष्य एक प्रवास असतो असं समजलं, तर या प्रवासात प्रत्येकजण

आपल्या क्षमतेनुसार सफल आणि सार्थक आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करत

असतो. या प्रयत्नात मार्गदर्शन करणारं ज्ञान म्हणजेच नीती हा अत्यंत उपयुक्त

असा घटक, जो नीतिशास्त्र म्हणून ओळखला जातो. नीतिशास्त्राचं ज्ञान हे

कोणत्याही टप्प्यावर आपल्याला उपयुक्त ठरतं. तेच नीतिशास्त्र पंडित

विष्णुशर्मा यांनी पंचतंत्रातल्या गोष्टीतून आपल्यासमोर मांडलं. या गोष्टींचा

बारकाईने अभ्यास केला तर आयुष्य सफल आणि सार्थक बनवण्यासाठी

काय मार्गदर्शन पंचतंत्र करतं याचा वेध घेता येतो. त्याचाच एक प्रयत्न

म्हणजे हे पुस्तक होय.

CA. Milind Shridhar Bhave | Manovikas Prkashan | 2026 | Marathi | Paperback | 168 |

View full details