Akshargranth
Pandharpurchi Wari by Deepak Phadnis पंढरपूरची वारी
Pandharpurchi Wari by Deepak Phadnis पंढरपूरची वारी
Couldn't load pickup availability
Pandharpurchi Wari by Deepak Phadnis पंढरपूरची वारी
पंढरपूर वारी - लाखो अनोळखी लोकांबरोबर केलेली यात्रा. भक्तीची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात प्रज्वलित होते आणि ‘मी’ ‘ते’ होतो आणि ‘ते’ ‘मी’. इथे आपल्याला ‘सोहम्’ चा खरा अर्थ उमगतो. वारीसोबत प्रवास करीत हे पुस्तक आपणास घेऊन जाते त्या पंढरपूरला, जे साक्षात भूवैकुंठ म्हणून ओळखले जाते. लाडक्या विठोबाचे परमधाम. या पुस्तकाबरोबरच आपण प्रवास करता, अनुभव घेत घेत, उभे रिंगण, गोल रिंगण, फुगड्या, उड्या, भजन, कीर्तन!
एका मंतरलेल्या, गूढ आणि मुग्ध करणाऱ्या जगात आपले मन रमते. पुस्तक वाचता वाचता तुम्ही गर्दीमध्ये विरघळून जाता, मैलोन् मैल चालण्याचे श्रम पण अनुभवता, अभंग आणि टाळ मृदंगाच्या संगीतात हरवून जाता, पण आतमध्ये कुठेतरी तुम्हाला तुमचा खरा ‘मी’ सापडतो, जो या भौतिक जगात हरवला होता!
पंढरपुर वारी मधील माझे अनुभव, वारीचा इतिहास, अन्य माहिती अणि अनेक रंगीत फोटो दिले आहेत. याशिवाय, जर आपल्याला वारी करायची असेल, तर त्यासाठी कशी तयारी करावी याची अथपासून इतीपर्यंत संपूर्ण माहिती दिली आहे.
Share
