Akshargranth
Potadi by Sunil Bhatambrekar (Author) पोतडी - सुनील भातंब्रेकर
Potadi by Sunil Bhatambrekar (Author) पोतडी - सुनील भातंब्रेकर
Couldn't load pickup availability
सुंदर जीवनाचा ध्यास ज्या मनाला लागतो ते मन स्वतः बरोबरच इतरांच्या जीवनालाही सुंदर बनवते. मग जीवन प्रवासातले सगळे चढ-उतार सुंदर दिसू लागतात. असे खाचखळगे प्रतिभेच्या सुंदर धाग्यानं गुंफल्यावर 'पोतडी" सारखा जीवनाचा व्यापक अर्थ सांगणारा जीवनस्पर्शी ग्रंथ वाचकांना वाचायला मिळतो. या ग्रंथातला प्रत्येक ललित लेख म्हणजे मनाची सुंदरताच आहे.. हे सगळेच लेख वाचकांच्या डोळ्यात नवं अंजन तर घालतातच पण माणसाला जमिनीवर पाय ठेवून उघड्या डोळ्यांनी चालायला भाग पाडतात. कोणत्याही लेखकाची ही प्रतिभाशक्तीच साहित्याला दर्जेदार बनवीत असते. भातंब्रेकरांच्या सजग प्रतिभेने या ग्रंथातील ललित लेखांना अनेक अंगांनी दर्जेदार बनविले आहे, हेच खऱ्या अर्थाने लेखकाचे प्रचंड मोठे यश आहे. वाचकांची मनं प्रकाशमान करण्याचं सामर्थ्य लेखकाच्या प्रतिभेत आणि निरीक्षणात असावं लागतं. भातंब्रेकरांच्या प्रतिभेत आणि शैलीत तेवढं सामर्थ्य आहे हे मी ठामपणे सांगतो आहे. त्याचं कारण माणसांच्या जीवनाविषयी, जीवनातल्या मंगलतेविषयी आणि भोवतालच्या सत्याविषयी लेखकाने केलेलं चिंतनच मला खूप मोलाचं आणि महत्त्वाचं वाटतं. वाचकांना सत्याच्या जवळ घेऊन जाण्याचे कौशल्य हेच या ग्रंथाचे मोठेपण आहे.
Sunil Bhatambrekar | Anagha Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 120 |