Akshargranth
Power to the parent – पॉवर द पॅरेंट
Power to the parent – पॉवर द पॅरेंट
Couldn't load pickup availability
Power to the parent -सुजाण पालक, योग्य मार्गदर्शक – पॉवर द पॅरेंट by Ishinna B. Sadana, Author -Aarti Devgaovkar
तुम्ही सौम्य पालक बनूनदेखील सीमारेषा कशा निश्चित करू शकाल? पालकत्वाच्या जवळजवळ दररोज येणाऱ्या नवनवीन आव्हानांना तुम्ही कसे सामोरे जाऊ शकाल? मुलांनी आपले म्हणणे ऐकण्यासाठी त्यांच्याशी छान जवळीक निर्माण कशी करू शकाल? ‘पॉवर टू द पॅरेंट’ या पुस्तकामध्ये आजच्या पालकांना भेडसावणाऱ्या सर्व समस्या, सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न आणि नानाविध द्वंद्व यांच्यावरील उत्तरे आहेत. या पुस्तकात, इशिन्ना बी. सदाना या पालकांशी संवाद साधतात; जेणेकरून त्यांना त्यांच्या मुलांच्या बाबतीतील सगळ्या नाजूक शंका आणि त्यांमुळे निर्माण झालेली भीती समजून घेण्यास मदत होईल. यामुळे पालकांना थोडे बरे वाटेल. ते एकदम निर्णय न घेता किंवा पूर्वग्रहरहित विचार करू शकतील. हे विचार पालकांना त्यांच्या मुलांशी, ती मोठी होत असताना उद्भवणाऱ्या विविध परिस्थितींमध्ये संभाषण करण्याचे सामर्थ्य देतात. इशिन्ना स्पष्ट व साधेपणाने लिहितात. त्या वास्तविक जीवनातील उदाहरणे व केस स्टडीज वापरतात, ज्या पालकांना पुस्तकातील धडे त्यांच्या आयुष्यात लागू करण्यासाठी सक्षम करतात. अनेक पालकांनी आपल्या मुलांशी वागताना त्यांनी सांगितलेल्या व्यावहारिक मार्गाचा अवलंब केलेला आहे आणि त्यांच्या बदलत्या वागण्याचा चांगला परिणाम आपल्या मुलांसोबतच्या नातेसंबंधात होताना पाहिले आहे. अखेर, जगात सर्वत्र पालकांना केवळ आनंदी आणि लवचीक मुलांचे संगोपन करण्यासाठीच नव्हे, तर अधिक आनंदी आणि अधिक आत्मविश्वास असलेले पालक बनण्यास सक्षम करते.
Vishwakarma Publication |
Share
