Akshargranth
Prakash Tantra by Achyut Godbole प्रकाश तंत्र-अच्युत गोडबोले प्रकाश तंत्रज्ञानाचा रंजक इतिहास
Prakash Tantra by Achyut Godbole प्रकाश तंत्र-अच्युत गोडबोले प्रकाश तंत्रज्ञानाचा रंजक इतिहास
Couldn't load pickup availability
Prakash Tantra by Achyut Godbole, Prakash Tantradnyanacha Ranjak Itihas - प्रकाश तंत्र प्रकाश तंत्रज्ञानाचा रंजक इतिहास - अच्युत गोडबोले
विज्ञानाचा जन्म होण्याआधीपासूनच प्रकाश आणि माणसाचं नातं जुळायला लागलं होतं.
माणूस प्रकाशाकडे सुरुवातीला आकर्षित झाला तो रात्रीच्या अंधारात उजेड मिळावा म्हणून आणि नंतर अन्न शिजवता यावं म्हणून.
दगड एकमेकांवर घासले की ठिणगी पडते; ती ठिणगी गवतावर किंवा लाकडावर पडली की, आपल्याला अंधारातही दिसायला लागतं हे त्याच्या लक्षात आलं.
शिवाय, प्रकाशाला म्हणजेच आगीला हिंस्र प्राणी घाबरतात हे लक्षात आल्यावर माणसाला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी एक हत्यारही मिळालं.
त्याचबरोबर अग्नीतून उष्णता निर्माण होते आणि आपल्याला थंडीत उबदार वाटतं हे समजल्यावर थंडीची चिंता काही अंशी मिटली.
एखाद्या भिंगातून सूर्यकिरणांचं एका बिंदूपाशी केंद्रीकरण केलं, तर तिथे खूप उष्णता निर्माण होते, हेही माणसाला खूप पूर्वीपासून कळलं होतं.
त्या एका ठिणगीनं माणसाचं आयुष्यच बदलायला लागलं.
हे का होतं? प्रकाश म्हणजे नेमकं काय?
हे सगळं त्याला त्याकाळी समजणं शक्यच नव्हतं.
थोडक्यात, त्याला त्यामागचं विज्ञान माहीत नव्हतं, पण कालांतरानं त्यानं ‘प्रकाशा’चं विज्ञान समजून तर घेतलंच, शिवाय त्याचा उपयोग तंत्रज्ञानातही करायला सुरुवात केली.
त्यातूनच विविध प्रकारचे दिवे, मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, टेलिव्हिजन, कॅमेरा, फिल्म्स, इतकंच काय; पण लेझर आणि सायबर ऑप्टिक्स यांची निर्मिती झाली.
यातल्या प्रत्येक शोधानं मानवी जगतात क्रांती आणली.
निसर्गातली अनेक रहस्यं उलगडत गेली. हा प्रवास फारच सुंदर आणि भुरळ घालणारा आहे.
Achyut Godbole | Bookganga Publication | New Edition | Language - Marathi | Paperback | Pages 344 |
Share
