Akshargranth
RAMAYAN Khel Jeevansanchitacha Aranyakand Dhairyache Phal
RAMAYAN Khel Jeevansanchitacha Aranyakand Dhairyache Phal
Couldn't load pickup availability
RAMAYAN Khel Jeevansanchitacha Aranyakand Dhairyache Phal by Shubha Vilas
रामायण -खेळ जीवनसंचिताचा- जीवना संपूर्ण महाकाव्याचोर्थ प्रामाणिक कथन -भाग तीन – अरण्यकांड -धैर्याचे फळ – विश्वासाचे संगोपन आणि संवर्धन
रामायण ही केवळ एक कथा नाही. ही एक जीवनशैली आहे. हा एक जीवनसंचिताचा खेळ आहे. आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टीविषयी त्रागा करणे, हे वेळ आणि शक्तीचा अपव्यय आहे. धैर्य, सातत्य आणि एकमेकांवरील अतुट विश्वासामुळे राम आणि लक्ष्मण यांनी वनवासाचा कठीण काळ यशस्वीपणे पूर्ण केला. रामायणातील पात्रांचे धैर्य आपल्या जीवनातील बिकट प्रसंगात आपली स्वतःची मूल्ये आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेला दर्शवितात आणि कशा प्रकारे आपण खालील गोष्टी करू शकतो, हे सांगतात : * गोंधळातून बाहेर पडणे, आपल्या मार्गावर अढळपणे राहण्यास रामांना त्यांच्या दृढ नीतिमत्तेने साह्य केले. * तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे. दुष्ट शक्तींवर विजय प्राप्त करण्यासाठी लक्ष्मणाला त्याच्या एकनिष्ठतेने साह्य केले. संकट काळातही स्थिर राहणे. अत्यंत बिकट परिस्थितीतही सहन करण्यासाठी सीतेला तिच्या लवचीकपणाने साह्य केले. आपल्या ध्येयांना पूर्णपणे प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे धैर्य आहे का? रामायण-खेळ जीवनसंचिताचा या मालिकेतील धैर्याचे फळ हे तिसरे पुस्तक आहे. हे पुस्तक वाल्मीकींच्या महाकाव्याच्या अरण्यकांडावर आधारित आधुनिक कथन आहे. यात धैर्याचे मधुर फळ प्राप्त कसे करावे, याचे वर्णन आहे. सत्ता आणि लोभ यांचे जीवनातील क्लिष्ट जाळे, या आधुनिक जगातील आपला संभ्रम आणि या सर्वांवर विजय प्राप्त करण्यासाठी लागणारे शहाणपण या पुस्तकातून ओसंडून वाहत आहे.
vishwakarma Publication |
Share
