Akshargranth
Ramayan Khel Jeevansanchitacha by Shubha Vilas
Ramayan Khel Jeevansanchitacha by Shubha Vilas
Couldn't load pickup availability
Ramayan Khel Jeevansanchitacha by Shubha Vilas
रामायण -खेळ जीवनसंचिताचा – जीवना संपूर्ण महाकाव्याचोर्थ प्रामाणिक कथन [ भाग एक] सूर्यवंशी राजपुत्रांचा उदय दुर्गुणाकडून सद्गुणांकडे
रामायण ही केवळ एक कथा नाही. ही एक जीवनशैली आहे. हा एक जीवनसंचिताचा खेळ आहे. चांगल्या खेळात क्षणोक्षणी आव्हाने आणि अनिश्चितता असते. हे महाकाव्य आपल्या जीवनातील आव्हानांना पेलण्यासाठी अनेक महत्त्वाची साधने प्रस्तुत करते. जीवनातील सर्वांत कठीण प्रसंगांशी धैर्यान दोन हात करणारा धाडसी योद्धा बनविणारे धडे या पुस्तकात आहेत. जीवनाच्या या खेळात आपण सर्व जण पुढील तीनपैकी एका श्रेणीत मोडतो. * सकारात्मक साहाय्यक विश्वामित्रांसारखे ऋषी समाजात सकारात्मक दृष्टीने योगदान देण्यासाठी प्रयत्नशील असतात. * नकारात्मक विध्वंसक मारीच आणि सुबाहू यांसारखे राक्षसी प्रवृत्तीचे लोक नकारात्मक विनाशाचे मायाजाल पसरवतात. संरक्षक मध्यस्थ राम आणि लक्ष्मण यांसारखे लोक सकारात्मक गोष्टी प्रदूषित होऊ नयेत यासाठी अथक परिश्रम घेत असतात. तर या खेळामध्ये तुम्हाला कोणती भूमिका पार पाडाबची आहे? सूर्यवंशी राजपुत्राचा उदय हे रामायण खेळ जीवनसंचिताचा या पुस्तकमालिकेतील पहिले पुस्तक आहे. वाल्मीकी रचित महाकाव्याच्या बालकांडावर आधारित आधुनिक कथन असलेले हे पुस्तक, जीवनाच्या वास्तवाचे दर्शन घडवते; तसेच बुद्धीला चालना देणाऱ्या शिकवणींना प्रस्तुत करते. अभ्यासू लेखक शुभ विलास या पुस्तकात आजच्या आधुनिक जगाच्या अनुषंगाने अमर जीवनमूल्ये स्पष्ट करत आहेत.
Vishwakarma Publications |
Share
