Skip to product information
1 of 1

Akshargranth

Rarang Dhang रारंगढांग by Prabhakar Pendharkar

Rarang Dhang रारंगढांग by Prabhakar Pendharkar

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist
Rarang Dhang रारंगढांग by Prabhakar Pendharkar - प्रभाकर पेंढारकर | प्रभाकर पेंढारकर यांचं हे अतिशय गाजलेलं पुस्तक. पेंढारकर यांनी अत्यंत वेगळा विषय रोचक पद्धतीनं हाताळला आहे. हिमालयात रस्ते बांधणारी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, सैन्यदलातील इंजिनिअरिंग विभाग, बॉर्डर रोडचा प्रमुख, टास्क फोर्स कमांडर्स या वेगळ्याच जगाबरोबर माणसांना आणि यांत्रांनाही थकविणारी हिमालयाची उंची, विरळ ऑक्सिजन, लहरी हवा, विलक्षण थंडी, दरडी कोसळणं, रक्त गोठवणारा बर्फ अशा बेभरवशी निसर्गाचं दर्शन घडतं. दुसरीकडे वेगवेगळ्या स्वभावाची माणसंही भेटतात. माणसं आणि निसर्ग यांचं नातं गुंफणारं, संघर्ष दाखविणारं वेगळं कथानक आकाराला येतं. पेंढारकरांची शैली चित्रमय आहे. त्यामुळे प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहतात. वाचक त्यात गुंतून पडतो.

Prabhakar Pendharkar | Mouj Prakashan Grih |

View full details