Akshargranth
Rutuchakra by Durga Bhagwat ऋतुचक्र
Rutuchakra by Durga Bhagwat ऋतुचक्र
Couldn't load pickup availability
ऋतुचक्र - Rutuchakra by Durga Bhagwat | Popular Prakashan | ऋतूंच्या लावण्यमहोत्सवाची चित्रे रेखाटणारे हे ललितनिबंध आहेत. दुर्गाबाईंनी डोळे भरून सृष्टीचे दर्शन घेतले आहे. निसर्गाची बदलती रूपे, पशुपक्ष्यांच्या हालचाली, रंगगंधांच्या बोलक्या संवेदना त्यांनी एखाद्या शास्त्रज्ञाच्या डोळस कुतूहलाने न्याहाळल्या आहेत. परंतु या शास्त्रीय दृष्टिकोनाला काव्यात्म प्रतिभेची मिळालेली जोड, हे या ललित निबंधांचे खरे वैशिष्ट्य आहे. या सृष्टीतल्या सर्व सौंदर्याचा भौतिक आणि कलात्मक आस्वाद घेणारे सौंदर्यासक्त मन त्यांच्याजवळ आहे. तसेच, या तरल सौंदर्यानुभवांना सेंद्रिय रूप देण्याचे, या अतींद्रिय क्षणांना इंद्रियांकरवी अनुभवायला लावण्याचे सामर्थ्य त्यांच्या प्रतिभेत आहे.
Durga Bhagwat | Popular Prakashan | Marathi | Paperback | Pages 148 |
Share
