Akshargranth
Sage Sangati By Sharadini Dahanukar
Sage Sangati By Sharadini Dahanukar
Couldn't load pickup availability
शरदिनी डहाणूकर यांच्या ‘वृक्षगान’ आणि ‘फुलवा’ या पुस्तकांतले सुगंधित जग फुले आणि झाडे यांच्यापुरतेच मर्यादित होते.” प्रस्तुत संग्रहातल्या शब्दचित्रांचा आवाका विस्ताराने खूप मोठा आणि सामाजिक आशयाने संपन्न असा आहे. इथे पोटासाठी प्रयोगशाळांना बेवारशी मांजरे विकणारी दलित कॅटवाली आहे आणि परोपकारासाठी स्वतःचे धन वेचणारा स्विस लक्षाधीशही आहे. मोठ्या हॉस्पिटलच्या बाहेर आपल्या जडिबुट्ट्यांचे दुकान थाटणारा कुडबुड्या वैदू आहे. तसेच आपल्या औद्योगिक कर्तृत्वाने नवीन नगरी वसवणारे उद्योगपतीही आहेत. नुसती माणसेच नव्हे तर घरातले मांजर, प्रयोगशाळेतले उंदीर, घरासमोरच आपल्या मादीबरोबर संसार थाटून बसलेला धनेश पक्षी हे सगळे लेखिकेच्या लेखणीचे सगे आणि सांगाती आहेत, कारण या लेखणीला जीवनााच्या अनेक अंगांविषयी विलक्षण कुतूहल आहे. त्यांच्याविषयी उत्कट आकर्षण आहे.
प्रस्तुत संग्रहात निसर्गातल्या आणि समाजाच्या इतक्या विविध वर्गातल्या विषयांची शब्दचित्रे आहेत की एकाच संग्रहात तशी पूर्वी कधी पाहिल्याचे वाचकांना क्वचितच आठवेल.
Share
