Akshargranth
Sahamatichi Hukumshahi by Milind Kirti aristocracy To technocracy
Sahamatichi Hukumshahi by Milind Kirti aristocracy To technocracy
Couldn't load pickup availability
Sahamatichi Hukumshahi by Milind Kirti aristocracy To technocracy
'Techology' आणि 'Sociotechology' या दोन्ही वेगवेगळ्या ज्ञानशाखा आहेत. 'Techology' या तांत्रिक ज्ञानशाखेपेक्षा 'Sociotechology' ही मानवावर अधिराज्य गाजविणारी अधिक व्यापक सामाजिक-आर्थिक ज्ञानशाखा अलीकडील काळातील आहे. तिची अद्याप पुरेशी स्पष्ट मांडणी झालेली नाही. 'Sociotechology' आणि 'Techology' यावर आधारित ‘Technophilosophy'ची मांडणी करण्याचा प्रयत्न 'कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग' या द्विखंडी ग्रंथात करण्यात आलेला आहे. 'तंत्र- तत्त्वज्ञाना'च्या प्राथमिक स्वरूपाचा परिचय वाचकांना 'कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग'च्या दोन्ही खंडात होतो. जीवनाचे तत्त्व जैव-सामाजिक होण्याकडून सामाजिक-जैविक होण्याकडे वळले आहे. पण मानवजात आता मनुष्यत्वाकडून बुद्धिमान यंत्राकडे मार्गक्रमण करीत आहे. मानवी जीवनाचे निर्णय एआय तंत्रज्ञानयुक्त मशीनच्या सल्ल्यानुसार घेण्याची प्रक्रिया वेग घेत आहे. हेच नवे कृत्रिम बुद्धिमत्ताधिष्ठित जग राहणार आहे. मुलींच्या संख्येवर झालेल्या गंभीर परिणामांमुळे सरकारने गर्भलिंग चाचणीवर बंदी घातली आहे, त्याप्रमाणे मानवी जीवन धोक्यात आणण्याच्या पातळीपर्यंत तंत्रज्ञानाचा वापर सुरूच राहणार काय, हा पहिला प्रश्न आणि तंत्रज्ञान हे अभिजन/ कुलीन वर्गाचे ऐश्वर्य वाढविण्यासाठीचे शस्त्र राहणार, की सामान्यांच्या कल्याणासाठी उपयोगात आणणार, असा लोकशाहीच्या भवितव्याचा दुसरा प्रश्न 'सहमतीची हुकूमशाही : ॲरिस्टोक्रसी टू टेक्नोक्रसी' हा ग्रंथ उभा करतो.
Milind Kirti | Lokvadmay Grih |
Share
