Akshargranth
Sakav साकव by Sangita Puranik
Sakav साकव by Sangita Puranik
Couldn't load pickup availability
मराठी लघुकथेला समृद्ध अशी परंपरा आहे. कथा ही नेहमीच लवचीक आणि कादंबरीपेक्षा खुली म्हटली जाते. कथाकाराला अधिक स्वातंत्र्य असते. ते स्वातंत्र्य घेत भोवतीच्या वास्तवाला सामावून घेणाऱ्या कसदार कथा संगीता पुराणिक यांच्या ‘साकव’ या कथासंग्रहात आहेत. त्यांच्या कथांचे विषय, आशय आणि मांडणी यांतील वैविध्यांमुळे या कथा वाचकांचे लक्ष वेधून घेतात. स्त्री-पुरुष नातेसंबंधातील गूढता सनातन आहे. इझमच्या पलीकडे जाऊन या स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा मार्मिक वेध या कथांमध्ये आहे. कथा म्हणजे गोष्ट किंवा अनुभवांचा वृत्तान्तही नसतो, प्रत्येक कथाकाराच्या दृष्टीनुसार तो जीवनाचा अन्वयार्थ लावत असतो, ती जीवनदृष्टी संगीता पुराणिक यांच्या ‘साकव’ या कथासंग्रहात दिसते. अनेक मानवी शक्यतांचा जिवंत साठा असणाऱ्या त्यांच्या कथा वाचनीय आहेत. माणूसपणाच्या कसोट्या पार करणाऱ्या या व्यक्तिरेखा उपऱ्या, परक्या न वाटता जिवंत वाटतात. देखण्या घराचे कोरीव दरवाजे बंद झाले की, आत रडण्या- कुढण्याचेच आवाज येतात; कारण हरवलेला संवाद, विस्कटलेली नाती आणि दुभंगलेली मने. माणसाच्या जगण्याचे असे अनेक पदर त्यांच्या कथांमध्ये दिसतात. या कथांमध्ये कादंबरीची बीजे आहेत. त्यांनी आता कादंबरी लेखनाकडे वळायला हवे. प्रा. मिलिंद जोशी (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे)
Sangita Puranik | Vishwakarma Publications | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 120 |
Share
