Akshargranth
Samaj Madhyamanvaril Lekhankaushalya समाज माध्यमांवरील लेखनकौशल्य
Samaj Madhyamanvaril Lekhankaushalya समाज माध्यमांवरील लेखनकौशल्य
Couldn't load pickup availability
Samaj Madhyamanvaril Lekhankaushalya by Vinod Jaitmahal समाज माध्यमांवरील लेखनकौशल्य - विनोद जैतमहाल
कंटेंट लेखक हे लिखाणातले अभिनेते असतात.
एखादी व्यक्ती किंवा संस्था विविध क्षेत्रांत मोठे काम करीत असते; पण हे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यवस्थित लिहिणे त्यांना जमेलच असे नाही. अशा वेळी चांगल्या कंटेंट लेखकाची गरज असते. कंटेंट का लिहावे लागते ? कारण प्रत्येक शिकलेली व्यक्ती चांगली लेखक असतेच असे नाही. लोक आपल्या व्यक्तिगत सोशल मीडिया पेजवर जमेल तसे लिहितात. पण जर हे सोशल मीडियाचे पेज तुम्हाला उद्योग, व्यवसाय वाढवण्यासाठी, जनसंपर्कासाठी किंवा स्वतःच्या प्रतिमानिर्मितीसाठी चालवायचे असेल तर कसेही लिहून चालत नाही. येथे कंटेंट रायटरची म्हणजेच आशय लेखकाची गरज लोकांना असते. कंटेंट लेखन म्हणजे विविध प्रकारच्या माहितीपूर्ण, आकर्षक व उपयोगी मजकुराची निर्मिती करणे होय.
कंटेंट लेखनाचे मुख्य उद्दिष्ट वाचकांचे मनोरंजन करणे, शिक्षण देणे किंवा त्यांना एखादे उत्पादन किंवा सेवेबद्दल माहिती देणे असते. दर्जेदार, आकर्षक पद्धतीने लिहिलेले कंटेंट कोणत्याही डिजिटल मार्केटिंग, वेबसाइट, ब्लॉग किंवा सोशल मीडियावरील मोहिमेच्या यशस्वितेसाठी सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. इंटरनेट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचा रस टिकवून ठेवण्यासाठी चांगल्या व उपयुक्त लेखन सामग्रीची खूपच गरज असते. -
Saket Prakashan |
Share
