Akshargranth
Samajik Lekhaparikshan - सामाजिक लेखापरीक्षण
Samajik Lekhaparikshan - सामाजिक लेखापरीक्षण
Couldn't load pickup availability
Samajik Lekhaparikshan - सामाजिक लेखापरीक्षण by Arjun Jadhav, Vaishali Joshi
"सामाजिक लेखापरीक्षण हे शासनाच्या विविध योजना आणि धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याची तपासणी करणारे परिणामकारक साधन आहे. या प्रक्रियेत शासन, सार्वजनिक व खासगी संस्था तसेच नागरिक यांची विकास प्रक्रियेतील भूमिका आणि जबाबदारी स्पष्ट होते. ङ्कसामाजिक लेखापरीक्षण : सामाजिक उत्तरदायित्त्व आणि पारदर्शकतेची दिशाङ्ख हे पुस्तक याच प्रक्रियेची सखोल मांडणी करते. या पुस्तकात सामाजिक लेखापरीक्षणाची संकल्पना, सिद्धांत, प्रक्रिया आणि विविध देशांतील अनुभव समाविष्ट आहेत. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी, संशोधक, विद्यार्थी यांना मार्गदर्शक ठरणार आहे. तसेच नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव ते करून देते. त्याचबरोबर कार्पोरेट जगताला त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करुन देते.
ग्रामसभा, जनसुनावणी, नागरी हक्क चळवळ यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना प्रभावी सहभागासाठी मदत होते. प्रशासनाशी संवाद साधण्यासाठी व लोकांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी सामाजिक लेखापरीक्षण एक पूल म्हणून कार्य करते. समाजशास्त्र, लोकप्रशासन, राज्यशास्त्र आणि सामाजिक कार्य या विषयांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अभ्यासासाठी उपयुक्त आहे. पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्याच्या दिशेने हे पुस्तक मोलाचे योगदान देते."
Share
