Akshargranth
Sasu Sunechi Sampurna Chaturmas Menu Diary
Sasu Sunechi Sampurna Chaturmas Menu Diary
Couldn't load pickup availability
Sasu Sunechi Sampurna Chaturmas Menu Diary - सासू सुनेची संपूर्ण चातुर्मास मेनू डायरी by Pranali Barpande
आषाढी शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या काळास चातुर्मास म्हटले जाते. या चार महिन्यांस धार्मिक महत्त्व आहे. या काळात अनेक सणवार येतात. उपवासही असतात. अनेक जण कांदा, लसूण खाण्यातून वर्ज्य करतात. अशा वेळी कोणते पदार्थ करता येतील याची माहिती व पाककृती शीला बारपांडे व प्रणाली बारपांडे यानी ‘सासू सुनेची संपूर्ण चातुर्मास मेन्यू डायरी’मधून दिल्या आहेत. चातुर्मासातील सण, उत्सवांनुसार कोणते पदार्थ करावे हे सांगितले आहे.
आषाढी एकादशीसाठी रताळ्याचा कीस, साबुदाण्याची धिरडी, शिंगाडा पिठाची सुरळीची वडी असे पदार्थ आहेत. सकाळ, दुपार व संध्याकाळ अशा गटात हे पदार्थ दिले आहेत. आषाढ शुक्ल द्वादशीला काकडी कटलेट, चना डाळ, दुधी भाजी, मुगडाळ आमटी, दुधीची खीर, त्रयोदशीला गाजर पोहे कटलेट, फरसबी-बटाटा भाजी, आषाढ कृष्ण एकादशी, श्रावण, भाद्रपद, आश्विन व कार्तिक महिन्यांमधील महत्त्वाच्या तिथींना कोणता मेन्यू करता येईल याची जंत्री यात असून, अनेक नावीन्यपूर्ण पदार्थांच्या पाककृती आहेत.
Pranali Barpande | Sandhikal Prakashan |
Share
