Skip to product information
1 of 1

Akshargranth

Sati Savitri Ani Itar strivadi Katha By Devdatta Pattanayak

Sati Savitri Ani Itar strivadi Katha By Devdatta Pattanayak

Regular price Rs. 240.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 240.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Sati Savitri Ani Itar strivadi Katha By Devdatta Pattanayak सती सावित्री आणि इतर स्त्रीवादी कथा 

स्त्री कुठल्याही जातीची असली तरी तिने पुरुषांच्या सेवेसाठी स्वतःला फक्त आई, मुलगी, बहीण किंवा पत्नी याच भूमिकेत पाहावं, कारण तोच स्त्रीधर्म आहे असं मनू म्हणतो. आधुनिक काळात आपण याला पुरुषसत्ताक पद्धत म्हणतो. अशा प्रकारे दुसऱ्यावर नियंत्रण ठेवण्याची, वर्चस्ववादाची बाजू घेण्याची ही गरज चिंताग्रस्त मानसिकतेतून येते, असं वेद सांगतात. हिंदू, बौद्ध आणि जैन लोककथांमध्ये स्त्रीधर्म कोणता, हे ठरवण्याचा अधिकार स्त्रिया पुरुषांना देत नाहीत. आधुनिक काळात आपण याला स्त्रीवाद असं म्हणतो. स्त्रियांच्या निवडीचा स्वीकार ही सूज्ञ आणि समर्थ मनाची अभिव्यक्ती आहे, असं वेदांमध्ये म्हटलं आहे.
पाश्चिमात्य पौराणिक साहित्यात पुरुषसत्ताक व्यवस्थेला पारंपरिक तर स्त्रीवादाला प्रागतिक मानलेलं आहे. मात्र भारतीय पौराणिक साहित्यात पुरुषसत्ताकता आणि स्त्रीवाद पुनर्जन्माच्या अंतहीन चक्रांतील निरंतर ताणामध्येही नेहमीच एकत्र राहिले आहेत. म्हणूनच मुक्ती ही पाश्चात्त्य संकल्पना नसून ती कायमच आपल्या संस्कृतीचा भाग राहिली आहे.

Devdutt Pattanaik |

View full details