Akshargranth
Satya Satta Ani Sahitya by Jayant Pawar सत्य, सत्ता आणि साहित्य - जयंत पवार
Satya Satta Ani Sahitya by Jayant Pawar सत्य, सत्ता आणि साहित्य - जयंत पवार
Couldn't load pickup availability
Satya Satta Ani Sahitya by Jayant Pawar सत्य, सत्ता आणि साहित्य - जयंत पवार, (लेख, भाषणं, प्रस्तावना, संस्मरणं, समकालीनांबद्दल, मुलाखती)
जयंत पवार यांच्या प्रस्तुत लेखसंग्रहात संपादित केलेले लेख, भाषणे आणि मुलाखती आजच्या महत्त्वाच्या वाड्मयीन प्रवृत्तीचा आणि प्रवाहांचा सर्वकष परिचय करून देतात. नाटककार, कथालेखक, समीक्षक, भाषांतरकार, पत्रकार म्हणून बिनीचा ठरलेला आणि इतर अनेक क्षेत्रांत मौलिक साहित्यनिर्मिती करणारा हा प्रतिभावंत आणखी किती संबंधित वैचारिक भूमिका पार पाडू शकतो, याचे आजच्या मराठी समाजाने केलेल्या प्रगतीचे हे उत्तम उदाहरण आहे. 'लालबाग-परळ'मधल्या कामगार वस्तीची पार्श्वभूमी लाभलेला गरीब मुलगा या परिघावरच्या मराठी समाजाचे प्रतिनिधित्व करत मराठी साहित्यात स्वतःची वाट पाडून एवढे योगदान करू शकला, ही आपल्या समाजाची आशावादी घटना ठरते. अशा आत्मनिष्ठ लेखकांमुळेच मराठी समाजात जातिवादी, फॅसिस्ट आणि बुरसटलेली मूल्ये समाजाच्या केंद्रस्थानी येऊ शकणार नाहीत, जयंत पवारांच्या सगळ्याच लेखांमधून आणि मुलाखतींमधून विद्रोही सूर उमटतो. अनेक पुरोगामी गटांच्या लेखकांशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती, हेही कळते.
Jayant Pawar | Papyrus Prakashan |
Share
