Akshargranth
Shashwat Naisargik Sheti by Rajendra Bhat
Shashwat Naisargik Sheti by Rajendra Bhat
Couldn't load pickup availability
जन-जंगल-जमीन संवर्धनासाठी
शाश्वत नैसर्गिक शेती
बहुस्तरीय बहुपीक सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून...
नैसर्गिक शेती म्हणजे निसर्गातील अनेक घटकांचा जैवभार, सेंद्रिय कर्ब, जमिनीतील असेंद्रिय द्रव्ये, एकात्म विचार करून, त्यांच्या सेंद्रिय जोडण्यांना सूक्ष्म जीव, वनस्पती, पाणी, कीटक, पक्षी आदींचा जराही धक्का न लावता, त्यांची वैशिष्ट्ये आणि मर्यादा यांचा आदर करून केली जाणारी शेती !
निसर्गात एकाच जमिनीत एकाच वेळी वेगवेगळी झाडे-झुडपे-गवते आणि वेगवेगळे जीवजंतू असतात. सर्वांना सारखे महत्त्व असणारे विविधतेचे हे सूत्र नैसर्गिक शेतीतही असते; म्हणूनच नैसर्गिक शेतीमध्ये एकपीक पद्धती अनुस्यूत नाही. नैसर्गिक शेती बहुपीक आणि बहुस्तरीय असते. केवळ शेतीच नव्हे तर त्याबरोबर आपली जीवनशैलीही निसर्गाला अनुसरून असणे अपेक्षित आहे. थोडक्यात, ही केवळ शेती नाही तर जीवनदृष्टी आणि जीवनशैली आहे.
राजेंद्र भट नैसर्गिक शेती पद्धतीचे बहुस्तरीय रूप उलगडून दाखवत तिचे सखोल आणि सर्वांगीण विवेचन प्रस्तुत पुस्तकात करतात. प्रत्यक्ष अनुभव, अभ्यास आणि चिंतन यातून साकार झालेले त्यांचे हे लेखन, अधिक मौल्यवान आणि उपयुक्त ठरते.
शेतकरी, अभ्यासक, अध्यापक, पर्यावरण व परिसंस्थेचे रक्षक सर्वानाच उपयुक्त ठरणारे पुस्तक.
Share
