Akshargranth
SHILOPYACHYA GOSTHI by B. D. KHER
SHILOPYACHYA GOSTHI by B. D. KHER
Couldn't load pickup availability
SHILOPYACHYA GOSTHI by B. D. KHER शिळोप्याच्या गोष्टी by भा. द. खेर
हा छोट्या-छोट्या सत्यकथांचा संग्रह आहे. या सर्व गोष्टी भा. द. खेर यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेल्या आहेत; यामध्ये भुताच्या गोष्टी आहेत, चकव्याच्या गोष्टी आहेत, स्मशानातल्या तसेच अगदी फजितीच्यासुद्धा गोष्टी आहेत. यातील बहुतेक कथा विनोदी स्वरूपाच्या आहेत; परंतु काही गंभीर कथा हृदयाचा ठाव घेणार्याही आहेत. वडिलांची परवानगी नसताना चोरून पोहायला जाणार्या खेर यांना एकदा विहिरीत नाग दिसला आणि ते वाघ मागे लागल्यासारखे पळत सुटले. या प्रसंगाचं वर्णन ‘आज्ञेची अवज्ञा’ या कथेत येतं. तर ‘वांझोटी बबूताई’मधून मूल नसलेल्या बबूताईची व्यथा व्यक्त होते. सत्याग्रही म्हणून तुरुंगात गेलेल्या खेरांची संकष्टी चतुर्थी तुरुंगातही कशी साग्रसंगीत साजरी झाली, याचं वर्णन येतं ‘तुरुंगातील चतुर्थी’ या कथेत. ‘पिलूताई अहेवपणी गेल्या’ या कथेत अहेवपणी मरण यावं अशी इच्छा करणार्या पिलूताईंची इच्छा कशी पूर्ण होते, हा कथाभाग आहे. खुसखुशीत भाषेतील, नर्मविनोदी शैलीतील कथांचा मनोरंजक आणि रंगतदार संग्रह.
Mehta Publishing House |
Share
