Akshargranth
Shivrajyabhishek - Prayojan , Prakriya Ani Parinaam by Sadanand More
Shivrajyabhishek - Prayojan , Prakriya Ani Parinaam by Sadanand More
Couldn't load pickup availability
Shivrajyabhishek - Prayojan , Prakriya Ani Parinaam
Author(s): Sadanand More
माणूस जन्माला येताना तीन ऋणे बरोबर घेऊन येतो असे भारतीय परंपरा सांगते. ही परंपरागत समजूत सर्वच मानवांना लागू होते असे म्हणायला काहीच हरकत नाही. इतकी ती सर्वव्यापक आहे. साहजिकच ती महाराष्ट्रातील लोकांनाही लागू होते. पण देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण यांच्याशिवाय महाराष्ट्रातील माणसे आणखी एक ऋण बरोबर घेऊन जन्माला येतात. ते ऋण म्हणजे अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचे ऋण! छत्रपतींच्या या ऋणाची विस्ताराने चर्चा करता येईल. तथापि अगदी एकच महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाल्यास असे म्हणता येईल की महाराजांनी महाराष्ट्राला अस्मिता दिली.
‘अस्मिता’ या शब्दाच्या जवळ येणारा इंग्रजी शब्द ‘identity’ आणि दुसरा मराठी शब्द म्हणजे ‘ओळख’. मात्र ‘अस्मिता’ म्हणजे फक्त ओळख नव्हे; तर जिचा अभिमान वाटावा, जी घेऊन मिरवावेसे वाटते अशी ओळख.
महाराजांच्या राज्याभिषेकदिन साजरा करणे ही महाराष्ट्रातील लोक अत्यंत मनापासून करत आलेली कृती आहे. हा दिवस आनंदाचा असल्यामुळे तो तसाच उत्साह आणि उत्सवपूर्वक साजरा करायलाच हवा, पण तो केवळ एक ‘event’ एवढ्यापुरते त्याचे स्वरूप मर्यादित न ठेवता रामदासांनी म्हटल्याप्रमाणे शिवरायांच्या विविध गुणांचा व कृतींचा स्मरणदिन म्हणूनही त्याच्याकडे पाहिले पाहिजे. त्यांचे स्मरण हे सदैव स्फूर्तिदायक आणि मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.
Share
