Akshargranth
Shree Shambhuchhatrapati Smarak Granth - श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ
Shree Shambhuchhatrapati Smarak Granth - श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ
Couldn't load pickup availability
Shri Shambhuchhatrapati Smarak Granth by Sushant Sanjay Udavant - श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ - सुशांत संजय उदावंत
छत्रपती संभाजी महाराजांचे स्वतःचे नाणे होते का? बुधभूषण ग्रंथात नेमके काय लिहिले आहे? आज हा ग्रंथ कुठे आहे? तब्बल नऊ वर्षे मोगलांच्या नाकी नऊ आणणारे मराठ्यांचे छत्रपती लढले कसे ? वारणेच्या बारा गावांचे नेमके प्रकरण काय आहे? पोर्तुगीजांना आपली राजधानी गोव्यामधून मुरगावला कशामुळे हलवावी लागली? संगमेश्वरच्या लढाईनंतर म्हाळोजीबाबा घोरपडे यांचे पुढे काय झाले ? त्यांची समाधी कुठे आहे? छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यासताना कोणत्या साधनांचा वापर करावा? छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र लिहिताना इतिहासाचे लेखनशास्त्र कसे असले पाहिजे? परकीय सत्तेविरुद्ध लढताना संभाजीराजांचे आरमार कसे होते ? इतिहासाचे भीष्माचार्य वा. सी. बेंद्रे यांनी १९६० साली संभाजीराजांवरील चरित्र ग्रंथ प्रकाशित केला परंतु या अगोदर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्र लिखाणाचे अथवा प्रसाराचे काही प्रयत्न बेंद्रे यांनी केले होते का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी हा स्मारक ग्रंथ जरूर वाचा.
Share
