Akshargranth
Shrishivaji Maharajanche Aarmar Athava Savalya Tandel - श्रीशिवाजी महाराजांचे आरमार अथवा सावळ्या तांडेल
Shrishivaji Maharajanche Aarmar Athava Savalya Tandel - श्रीशिवाजी महाराजांचे आरमार अथवा सावळ्या तांडेल
Couldn't load pickup availability
Shrishivaji Maharajanche Aaramar Athava Savalya Tandel - श्रीशिवाजी महाराजांचे आरमार अथवा सावळ्या तांडेल (Marathi Paperback Edition)
छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या आरमाराची केव्हा स्थापना झाली, त्यासंबंधी निश्चयात्मक उल्लेख केलेला कोठेच आढळत नाही. तसेच त्यांच्या आरमारासंबंधी सर्व हकीकतही उपलब्ध नाही. ही माहिती मिळावी म्हणून मी शक्य तितका प्रयत्न केला, माझ्या काही इतिहासप्रिय विद्वान मित्रांसही विचारले, परंतु त्यांनी मला ठराविक एक दोन पुस्तकांकडे बोट दाखविण्यापलिकडे काही केले नाही. एकंदरीने सर्व महाराष्ट्रास अत्यंत वंद्य व ‘असन्निवृत्यै तदतीतमेव’ म्हणून अत्यंत प्रिय आणि संस्मरणीय असलेले श्रीशिवाजी महाराज यांच्या आरमाराची संपूर्ण माहिती एकत्र नसावी अगर ती उपलब्ध करण्याचा प्रयत्न होऊ नये ही गोष्ट इतिहास शोधक म्हणवून घेणाऱ्यांच्या केव्हा लक्षात येईल तो सुदिन! नाही म्हणण्यास रा. ब. पारसनीस यांनी आपल्या ‘मराठ्यांच्या आरमारा’त महाराजांच्या कारकिर्दीतील आरमाराची एका भागात माहिती दिली आहे, परंतु ती अगदी अल्प आणि त्रोटक अशी आहे.
Author - Nath Madhav | Varada Books | Latest New Edition | Marathi | Paperback |