Skip to product information
1 of 1

Akshargranth

Sindhi by Rohini Tukdeo, Onkar Thorat

Sindhi by Rohini Tukdeo, Onkar Thorat

Regular price Rs. 399.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 399.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

जिच्याशी तुमचं सारं आयुष्य सर्वार्थाने बांधलं गेलेलं असतं, त्याच 

भूमीतून अचानक उखडून फेकलं जातं आणि एका क्षणात होत्याचं 

नव्हतं होतं. तेव्हा समोर सर्वत्र नुसता अंधार पसरतो. जगण्याचे सारे 

मार्ग बंद होतात. कुठे जावं, काय करावं आणि कसं जगावं असे 

अनेक प्रश्न समोर उभे ठाकतात. तरीही जगण्याची धडपड सुटत 

नाही. रडतखडत, ठेचकाळत का होईना धडपड चालू राहते आणि 

एक वेगळं विश्व नव्यानं साकारते. त्याचीच ही कहाणी आहे.

खरंतर ही कहाणी आहे सिंधी समूहाची. ज्यांनी फाळणीची दाहकता 

अनुभवली, अचानक उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या स्थलांतराची वेदना 

अनुभवली, त्यानंतरची विस्थापितांच्या वाट्याला येणारी आयुष्याची 

फरफट आणि ससेहोलपट अनुभवली अशा सिंधी समूहाची ही कहाणी 

आहे. यात व्यथा आहेत, वेदना आहेत, विरहाचं दुःख आहे, जगणं उद्ध्वस्त 

झाल्याची आणि परिणामी सारं काही गमावल्याची तीव्र सल आहे. 

असं असूनही त्यात दुःखाला कवटाळून बसण्याचं भावनाशून्य गोठलेपण 

नाही, तर यातून बाहेर पडण्याची सजगपणे केलेली धडपड आणि नवी 

मूल्ये अंगीकारत नव्यानं उभं राहत वेगळी ओळख निर्माण करण्याची 

उमेद आहे.

...आणि म्हणूनच विस्थापनाच्या आणि त्यानंतरच्या आर्थिक विपन्नतेच्या 

महाभयंकर संकटाशी सामना करावा लागल्यानंतरसुद्धा, हा समूह 

अल्पसंतुष्टता आणि परात्मभाव यांच्या खोड्यात अडकून पडत नाही. 

उलट अत्यंत बिकट परिस्थितीतही गवसलेली बहुअस्मिता आणि 

बहुसांस्कृतिकता ही अनमोल मूल्ये अंगिकारतो. आणि हाच सकारात्मक 

दृष्टिकोन जोपासत तो उद्योजकतेचा नवा अवकाश घडवत नवभारताच्या 

आणि नव्या आर्थिक युगाच्या निर्माणात आपला वेगळा ठसा उमटवतो.

त्याची ही प्रेरक शोधगाथा ... प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी, लादल्या 

गेलेल्या विस्थापनातून घडलेल्या जिद्दीची कहाणी...


Sindhi | Rohini Tukdeo, Onkar Thorat

सिंधी । रोहिणी तुकदेव, ओंकार थोरात

Manovikas Prakashan |

View full details