Skip to product information
1 of 1

Akshargranth

Smile Please by Supriya Vakil स्माइल प्लिज - सुप्रिया वकील

Smile Please by Supriya Vakil स्माइल प्लिज - सुप्रिया वकील

Regular price Rs. 198.00
Regular price Rs. 220.00 Sale price Rs. 198.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

आजूबाजूची माणसं, परिस्थिती, काळाच्या ओघात घडलेले बदल इ. बाबींवर खुसखुशीतपणे भाष्य करणारे लेख या लेखसंग्रहात आहेत. काही माणसं अशी असतात की त्यांनी काही वाचलं नाही, ऐकलं नाही. असं नसतंच मुळी. सगळंच माहीत असतं त्यांना. तर अशा व्यक्तीचं प्रातिनिधिक चित्र ‘सव्यसाची’ या लेखातून साकारलंय त्यांनी. तर काही विशिष्ट हेतूसाठी गळेपडूपणा करणार्‍या व्यक्तीचं प्रातिनिधिक चित्र रेखाटलंय ‘तुझ्या गळा...माझ्या गळा’ या लेखातून. पहाटे फिरायला गेलेल्या असताना एका कुत्र्याने रस्त्यात घातलेल्या गोंधळाचं रंगतदार चित्रण केलंय ‘दुम मचा ले...’ या लेखात. जाहिरातींच्या विश्वातल्या सदैव तरतरीत असणार्‍या बायकांचा खास शैलीत वेध घेतला आहे ‘नाहीतर आम्ही आहोतच’ या लेखात. तसेच खड्डेमय रस्ते, मेमरी ड्रॉइंग, मालिका व चित्रपटांमधील आजारपणं इ. विविध विषयांवरचे, अगदी साध्यासुध्या विषयांवरचे खुसखुशीत लेख आपल्या चेहर्‍यावर ‘स्माइल’ आणतात.

Supriya Vakil | MEHTA PUBLISHING HOUSE | NEW EDITION | MARATHI | PAPERBACK | PAGES 140 |

View full details