Akshargranth
Sosyur Te Chomski Translated by Milind Malshe सोस्यूर ते चॉम्स्की
Sosyur Te Chomski Translated by Milind Malshe सोस्यूर ते चॉम्स्की
Couldn't load pickup availability
Sosyur Te Chomski Translated by Milind Malshe सोस्यूर ते चॉम्स्की भाषांतर : मिलिंद मालशे
सोस्यूर ते चॉम्स्की : आधुनिक भाषाविज्ञानातील काही मूलभूत निबंधांचे सटीप भाषांतर
फेर्दिनां द सोस्यूर या फ्रेंचभाषक स्विस प्राध्यापकाने जिनिव्हा येथे दिलेल्या व्याख्यानांचे, त्याच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या टिपणांचे पुस्तक, त्याच्या मृत्यूनंतर १९१६ साली फ्रेंचमध्ये प्रसिद्ध झाले. आधुनिक भाषाविज्ञानाची गंगोत्री असे त्या पुस्तकाचे वर्णन करता येईल, त्यापूर्वीचा भाषाभ्यास शब्दांची व्युत्पत्ती, व्याकरण, भाषेचा इतिहास, भाषांची तुलना, ध्वनी अशा विविध ज्ञानशाखांद्वारे होत होता; पण सोस्यूरच्या पुस्तकानंतर एककालिक भाषाभ्यास म्हणजे भाषाविज्ञान खऱ्या अर्थाने विकसित होऊ लागले. सोस्यूरच्या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर १९५९ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत सोस्यूरप्रमाणेच एमिनो, याकबसन, हाइम्झ, लबव, ब्राइट, रामानुजन आणि चॉम्स्की या आघाडीच्या विचारवंतांनी मांडलेल्या काही मूलभूत भाषावैज्ञानिक तत्त्वांचा आणि सिद्धांतांचा परिचय या पुस्तकातील लेखांच्या भाषांतरांमधून आणि त्यांची प्रास्ताविके व टिपा यांमधून होईल. ही भाषांतरे डॉ. मिलिंद मालशे यांनी केली आहेत. ‘आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन’ हे मराठीतील पहिले व उत्तम पाठ्यपुस्तक लिहून डॉ. मालशे यांनी मराठीच्या विद्यार्थ्यांची सोय केलीच आहे. ही भाषांतरे म्हणजे त्या पुस्तकाला पुरवणीच आहे, असे म्हणता येईल. या काटेकोर व परिश्रमपूर्वक केलेल्या भाषांतरामुळे मराठीच्या अभ्यासकांची भाषाविज्ञानाची समज अधिक व्यापक व सखोल होईल, अशी मला खात्री वाटते.
– प्रा. प्र. ना. परांजपे
Lokvadmay Grih Prakashan |
Share
