Akshargranth
Sulabh Mahabharat सुलभ महाभारत - राजा मंगळवेढेकर
Sulabh Mahabharat सुलभ महाभारत - राजा मंगळवेढेकर
Couldn't load pickup availability
महाभारतात व्यासांनी असंख्य मानवी प्रवृत्तींना मूर्तरूप दिले. महाभारतात जे आहे ते सर्वत्र सापडते आणि इथे जे नाही ते कुठेही सापडत नाही असे म्हटले जाते. सत्तेसाठी खेळलेले चांगले-वाईट डावपेच, त्यांचे परिणाम, नात्यांमधील प्रेम, तेढ, लालसेपोटी साधलेला स्वार्थ, सूड, निस्वार्थ बुद्धीने घेतलेले निर्णय, दैवापेक्षा प्रयत्नवादावर ठेवला जाणारा विश्वास, पराकोटीचा नीचपणा आणि पराकोटीची उदात्तता या सर्व आणि इतरही अनेक भावभावनांची एक विलक्षण गुंफण महाभारत वाचताना अनु भवायला मिळते.
ही कथा केवळ सत्ता मिळवण्यासाठी झालेल्या युद्धाची नाही, तर न्याय मिळवण्यासाठी पांडवांनी आयुष्यभर केलेल्या संघर्षाचीही आहे. कृष्णाने अर्जुनाला केलेल्या, पितामह भीष्मांनी पांडवांना केलेल्या नैतिक मार्गदर्शनाची जशी ती गोष्ट आहे, तशीच धूर्त शकुनीने केलेल्या कपटाचीही आहे.
मंगळवेढेकरांनी रसाळ आणि ओघवत्या शैलीत सांगितलेल्या या गोष्टी गोपाळ नांदुरकरांच्या चित्रांनी जिवंत केल्या आहेत.
Raja Mangalvedhekar | Jyotsna Prakashan |
Share
