1
/
of
1
Akshargranth
Suvarnacha Itihas सुवर्णाचा इतिहास by H A Bhave Marathi Edition

Regular price
Rs. 95.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 95.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Suvarnacha Itihas सुवर्णाचा इतिहास by H A Bhave Marathi Edition
सोने हा धातू मानवाने शोधलेला पहिला धातू आहे. तो शुद्ध स्वरूपात नदीच्या वाळूत सापडत असे. सोन्यात अनेक गुण असल्यामुळे सोन्याचे सामर्थ्य मानवाला इतिहासपूर्व काळापासून माहित आहे. कोलंबस अमेरिकेला पोचला तेव्हा शेती माहीत नसलेले तेथील आदिवासी सोन्याचे दागिने घालून फिरत आहेत, असे त्यास दिसले. सुवर्णाचा उपयोग आता चलन म्हणून होत असला तरी, इतिहासपूर्व काळापासून सोन्याचा उपयोग मुख्यतः अलंकारासाठी होत होता. सुवर्ण मुख्यत: नदीच्या पात्रातच सापडत असे. जमिनीत खोल खणून सोने मिळवण्याच्या खाणी खूपच उशिरा सुरू झाल्या. सोन्याला संस्कृतमध्ये जांबुनद (जंबू नदीत मिळणारे) गांगेय (गंगा नदीत मिळणारे) अशी नावे आहेत. आता तर सुवर्णाच्या खाणीत खूपच गुंतागुंतीची यंत्रसामुग्री वापरली जाते. शिसे किंवा पाऱ्यापासून सोने मिळवण्याची युक्ती शोधता शोधताच संपूर्ण 'रसायनशास्त्र' निर्माण झाले आहे. या क्रियेलाच पूर्वी 'किमया' असे म्हणत असत. सुवर्णाची कसोटी, परीक्षा व शुद्धतेचे प्रमाण कसोटीच्या दगडावर रेघ ओढून करीत असत. सुवर्णाच्या देवमुर्ती करण्याचा प्रघात फार जुना आहे. हजार वर्षापूर्वी पुरून ठेवलेली सुवर्णाची गणेशमुर्ती अलिकडेच दिवेआगर येथे सापडली आहे.
अलिकडेपर्यंत सुवर्णाच्या नाण्यांचाच उपयोग राष्ट्राराष्ट्रातील व्यापारासाठी होत असे. उदा. सुवेझ कालव्यातून जहाज नेताना भाडे सोन्याच्या नाण्यातच द्यावे लागे. सुवर्णाचा व्यापार, व्यवहार कसा चालतो याचीही सविस्तर माहिती या पुस्तकात दिली आहे. सन १८४८ नंतर कॅलिफोर्नियात, त्यानंतर ऑस्ट्रेलियात आणि त्यानंतर कॅनडात सुवर्णाच्या प्रचंड साठ्याचा शोध अचानक लागला. त्यावेळी हा प्रचंड साठा लुटायला सर्व जगातील धाडसी लोकांची 'सुवर्णधाव' सुरू झाली. या रोमहर्षक घटनेची सविस्तर माहिती वा पुस्तकात वाचायला मिळेल.
पहिल्या परिशिष्ठात दिवेआगर येथे सापडलेल्या सुवर्ण गणेश शोधाची संपूर्ण माहिती दिली आहे. दुसऱ्या परिशिष्ठात पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या भारतीय संस्कृती कोशातले' सुवर्णाचे सर्व उल्लेख, माहिती व प्राचीन भारतातील सुवर्णाचा इतिहास संक्षिप्त स्वरूपात दिला आहे. तिसऱ्या परिशिष्टात सुवर्णाचा अनुभार, विशिष्ठ गुस्त्व बगैरे सर्व रसायनशास्त्रातील माहिती दिली आहे.

H A Bhave | Varada Books | Latest New Edition | Marathi | Paperback |
Share