Akshargranth
Swarswamini Asha स्वरस्वामींनी आशा by Manjiri Amey Hete, Prasad Mahadkar
Swarswamini Asha स्वरस्वामींनी आशा by Manjiri Amey Hete, Prasad Mahadkar
Swarswamini Asha स्वरस्वामींनी आशा by Manjiri Amey Hete, Prasad Mahadkar
आशा भोसले
माझी आशाची पहिली ओळख झाली तेव्हा
तिची छबी ही साधे पाचवारी पातळ, पोलके,
कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा, गच्च केसांच्या
दोन वेण्या आणि हातात खूपशा सोन्याच्या बंगड्या
घालणारी स्त्री अशी होती;
जी मनमोकळ्या, लाघवी व थट्टेखोर स्वभावाची होती.
'जिवलगा, राहिले रे दूर घर माझे"
हे मी लिहिलेले गाणे आशाने गायले अहे;
त्याच्या रेकार्डिंगच्या वेळी तिने काठावर फाटलेली
पांढरी रेशमी साडी घातली होती. त्या फाटलेल्या
साडीला मी सुई दोऱ्याने चार टाके घातले होते.
फाटकी साडी केवळ लकी आहे
म्हणून नेसणारी आशा ही अशी जरा मन:स्वी आहे.
आशाचे तिच्या सर्व भावंडांवर प्रेम आहे व
त्याचीच प्रचिती लता दीदींवर तिने लिहिलेल्या
'आमचे छोटे दादा' यामध्ये आली आहे,
पण जिभेने ती जरा तिखट आहे.
Manjiri Hete, Prasad Mahadkar | Dimple Publication | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 400 |