Akshargranth
The Art Of Deep Thinking (Marathi Edition) Punarvichar Kara
The Art Of Deep Thinking (Marathi Edition) Punarvichar Kara
Couldn't load pickup availability
The Art Of Deep Thinking (Marathi) Punarvichar Kara - द आर्ट ऑफ डीप थिंकिंग (मराठी) पुनर्विचार करा by Sirshree
“अनावश्यक विचारांपेक्षा स्पष्ट विचार करण्यावर विश्वास ठेवा.
आलिशान बंगल्यापेक्षा अविचल शरीरात राहण्यावर विश्वास ठेवा.”
हे वाक्य वाचून स्पष्ट, डीप विचारांची, किमया अनुभवलीय का? होय, आलिशान घरात राहण्यापेक्षा आपलं शरीर स्वस्थ आणि मन अकंप बनवणं अधिक महत्त्वपूर्ण आहे. कारण आपलं शरीर म्हणजे एक आलिशान बंगलाच (स्वर्ग) आहे. तसंच अनावश्यक आणि अनियंत्रीत विचारांपेक्षा स्पष्ट आणि सकारात्मक विचार करणं कधीही श्रेयस्कर!
स्पष्ट विचारांमुळे समस्या सोडवणं सहज-सुलभ होतं. त्याचप्रमाणे जीवनाकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन प्राप्त होतो, आपण यशस्वी जीवनाचा आनंद घेऊ शकतो. हाच उद्देश लक्षात ठेवून हे पुस्तक वाचा-
* स्पष्ट विचार म्हणजे काय? ते विकसित कसे करावे?
* विचारांमध्ये स्पष्टता आणण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त ठरते?
* स्पष्ट विचारांद्वारे दैनंदिन जीवन सहज-सरळ कसे जगावे?
* स्पष्ट विचारांनी, यांत्रिक जीवनापासून मुक्ती कशी मिळवावी?
* डीप थिंकिगद्वारे जीवनाच्या प्रत्येक आयामावार, पैलूवर मनन करून आयुष्य सर्वोत्कृष्ट कसे बनवाल?
जशी पाण्यात चालणार्या नावेला किनार्यावर पोहचण्यासाठी योग्य दिशा देणे आवश्यक असते, अन्यथा ती मध्येच भरकटू शकते. त्याचप्रमाणे आपल्या विचारांनाही योग्य, स्पष्ट दिशा देणं गरजेचं असतं. प्रस्तुत पुस्तकात हीच कला शिकवली गेली आहे, ज्यायोगे डीप थिंकिगची सवय आत्मसात करून आयुष्याला नवी दिशा बहाल करू शकाल.
Sirshree | Wow Publishings Pvt. Ltd |
Share
