Akshargranth
TRIKONI SAHAS by Pragati Patil त्रिकोणी साहस - प्रगती पाटील
TRIKONI SAHAS by Pragati Patil त्रिकोणी साहस - प्रगती पाटील
Couldn't load pickup availability
या पुस्तकाची कथा सुरू होते पृथ्वीपासून लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या 'श्वेतालिया' नावाच्या परग्रहावर. या श्वेतालियाच्या सूर्यमालेत एक नव्हे, तर तब्बल चार सूर्य आहेत! या ग्रहावर 'साहस श्वेतम' नावाचा एक मुलगा राहतो, जो आपल्या 12 वर्षांच्या आयुष्यात (इच्छा असूनही) कधीही आपल्या शहराबाहेर गेलेला नाहीये. त्याच्या 12 व्या वाढदिवशी त्याला एक गूढ संदेश मिळतो आणि त्या संदेशाचा पाठपुरावा करताना तो अनेक नवनवीन रहस्यांमध्ये गुंतत जातो, अनेक अद्भुत प्रदेशांत जाऊन अनेक नवनवीन संकटांचा सामना करतो. या शोधमोहिमेत त्याला नवीन मित्रही मिळतात अन् शत्रूही. आजवर कधीही न अनुभवलेले नवीन खेळ, कला, कोडी (पझल्स), संगीत, नृत्य, खाद्यपदार्थ, भाषा, संस्कृती यांचा त्याला परिचय होतो. विश्वातील नवनवीन प्रदेशांत भ्रमंती करणारा साहस आपल्या साहसी कृत्यांनी एक दिवस संपूर्ण विश्वाला तारणार आहे की आपल्या उतावळ्या, उपद्व्यापी वृत्तीने गंभीर संकटे ओढवून घेऊन संपूर्ण विश्वाला मारणार आहे. तो नक्की काय करतो ते पुस्तकात वाचणेच योग्य ठरेल...
Pragati Patil | Sadhana Prakashan |
Share
