Akshargranth
Tumchi Kala Tumache Career तुमची कला तुमचे करिअर by Subhash Vaman Bhave
Tumchi Kala Tumache Career तुमची कला तुमचे करिअर by Subhash Vaman Bhave
Couldn't load pickup availability
तुमची कला तुमचे करिअर | Tumchi Kala Tumache Career - Subhash Vaman Bhave, Manohar Keshav Ingle |
"कोणतीही क्रिया कौशल्यपूर्ण करणं म्हणजे कला, असं म्हणता येईल. भारतीय परंपरेत चौसष्ट कलांचा उल्लेख आहे. कला हे रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा मिळवण्याचं एक साधन आहे, तसंच तो ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे, असं मानण्यात येतं. तरीही भारतीय परंपरेत कलेकडे अर्थार्जनाचं साधन म्हणून बघितलेलं आपल्याला दिसत नाही.
अनेक मुलांच्या अंगात विविध कला असतात. मात्र ‘अर्थार्जन’ हेच बहुतेक सर्वांच्याच शिक्षणाचं ध्येय असल्याने आणि कलेतून अर्थार्जन अशक्य असल्याची बहुतेक पालकांची ठाम श्रद्धा असल्याने अशा मुलांची कला छंदापुरती मर्यादित राहते. यातून ही मुलं केवळ अर्थार्जनासाठी नावडतं काम करत राहतात आणि कामातल्या आनंदाला पारखी होतात.
Subhash Vaman Bhave, Manohar Keshav Ingle | Diamond Publications | Latest Edition | Language - Marathi | Paperback | Pages 88 |
Share
