Akshargranth
Tumhihi wha Shrimant by Shekhar Gajbhar
Tumhihi wha Shrimant by Shekhar Gajbhar
Couldn't load pickup availability
श्रीमंत असणं किंवा श्रीमंत होणं याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी
असू शकते. अर्थात ‘श्रीमंत’ हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या समोर
लब्धप्रतिष्ठीत व्यक्ती उभा राहातो. ‘तुम्हीही व्हा श्रीमंत!’ असं म्हणत
असताना प्रत्येकाने लब्धप्रतिष्ठीत बनावं किंवा तसं बनता येतं, असं
बिलकूल सुचवायचं नाही. किंबहुना तशा कुठल्याही उद्देशाने हे पुस्तक
लिहिलेलं नाही. ‘आर्थिक विवंचनेतून बाहेर पडत सुखानं, समाधानानं
जगण्यासाठी व आयुष्य समृद्ध बनवण्यासाठीच्या आवश्यक गरजांची
पूर्तता करता येईल इतपत गंगाजळी निर्माण करणं म्हणजे श्रीमंत होणं’
हा दृष्टिकोन या पुस्तकाच्या निर्मितीमागे आहे.
त्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नाचं योग्य नियोजन कसं करावं याबरोबरीनेच
सनदशीर मार्गाने आणखी उत्पन्न कसं वाढवायचं याचे धडे या पुस्तकातून
आपल्याला मिळतील. त्याचबरोबरीने बचत आणि गुंतवणूक ही आपली
जीवनशैली बनावी याकरता काय करावं आणि जे करायचं ते कसं करावं
याचं अनुभवसिद्ध मार्गदर्शन हे पुस्तक करेल. ग्रामीण भागातल्या
कष्टकऱ्यांपासून महानगरीय नोकरदार, उद्योजक-व्यावसायिकांपर्यंतच्या
प्रत्येक घटकाच्या आर्थिक स्थैर्याचा समग्र विचार मांडणारं हे पुस्तक
आपल्या हाती कायम असलंच पाहिजे.
Tumhihee Wha Shreemant! Shekhar Gajbhar
तुम्हीही व्हा श्रीमंत! । शेखर गजभार
Manovikas Prakashan |
Share
