Akshargranth
Udavach Maan Mazi उडवाच मान माझी by दिलीप पांढरपट्टे
Udavach Maan Mazi उडवाच मान माझी by दिलीप पांढरपट्टे
Couldn't load pickup availability
Udavach Maan Mazi by Dilip Pandharpatte, Dimple Publication,
दिलीप पांढरपट्टे यांचा 'उडवाच मान माझी' हा ग़ज़लसंग्रह अनुभवताना, असे मला ठामपणे वाटते की ग़ज़लचे तंत्र आणि मंत्र त्यांना गवसले आहेत. अनेकांना दुर्मिळ असलेले ग़ज़लचे अंतर्यामी रहस्य त्यांना सहजपणे आकळले आहे. गज़ल ही निव्वळ शब्दांची कसरत नसते, शब्दांना अम्लान रूपसौंदर्य, सतेज रसवत्ता, अक्षय गंध नि करुणामय स्पर्श जेव्हा लाभतो, तिथे गज़लचा बंध जन्माला येतो. असे विविध व विपुल अभिजात बंध दिलीप पांढरपट्टे यांनी रसिकांना पेश केले आहेत. ग़ज़ल त्यांना वश झाली आहे..! जीवनाच्या अथांगतेच्या सागराचा तळ शोधण्याची दिलीप पांढरपट्टे यांची मुमुक्षु वृत्ती, हे त्यांच्या अभिजात गज़लांचे वृत्त आहे. शल्यापासून कौशल्याकडे, अनुरागापासून वितरागाकडे, उपभोगापासून त्यागाकडे, आसक्तीपासून विरक्तीकडे, हव्यासातून न्यासाकडे जाणारा मनोमार्ग सूफी तत्त्वज्ञानाचा अर्क नि चिद्विलासी अद्वैताचा तर्क, हे दिलीप पांढरपट्टे यांच्या ग़ज़ल लेखनाचे मर्म आहे..! ---- अशोक बागवे
Dr. Dilip Pandharpatte (Author) | Dimple Publication | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 102 |
Share
