Akshargranth
Laghuudogasathi Mahiti Tantradnyan लघुउद्योगांसाठी माहिती तंत्रज्ञान
Laghuudogasathi Mahiti Tantradnyan लघुउद्योगांसाठी माहिती तंत्रज्ञान
Couldn't load pickup availability
Laghuudogasathi Mahiti Tantradnyan by Dr Deepak Shikarpur लघुउद्योगांसाठी माहिती तंत्रज्ञान - डॉ. दीपक शिकारपूर
‘लघुउद्योगांसाठी माहिती तंत्रज्ञान’ हे डॉ. दीपक शिकारपूर लिखित पुस्तक लघुउद्योगांच्या सर्वांगीण विकासासाठी, वाढीसाठी आवश्यक असलेल्या माहिती तंत्रज्ञानाचे (आयटी) महत्त्व अधोरेखित करते. सध्या मोठ्या उद्योगांबरोबरच लघुउद्योजकही आपल्या व्यवसायात आधुनिकता आणण्याचा, आपला व्यवसाय ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचे सकारात्मक चित्र आज सर्वत्र दिसते आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात माहिती तंत्रज्ञानाची कास धरल्याशिवाय कोणीही तग धरू शकत नाही, हे वास्तव आज सर्वच व्यावसायिकांनी, उद्योजकांनी स्वीकारल्याचे चित्र आपल्याला दिसते. डॉ. दीपक शिकारपुरांनी आपल्या या पुस्तकात माहिती तंत्रज्ञानातील सध्याच्या प्रचलित प्रवाहाबरोबरच भविष्यात येऊ घातलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचीही अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. जी प्रस्थापित उद्योजकांबरोबरच नव्याने व्यवसाय करणाऱ्या लहान उद्योजकांनाही फायद्याची ठरेल. नव्या युगाचे नवे बिझनेस मंत्र आपल्याला या पुस्तकात सापडतील, ज्यायोगे आपण आपल्या उद्योग व्यवसायाच्या सीमा निश्चितच लांघू शकू, याची खात्री वाटते.
Vishwa
Share
