Akshargranth
Hitler & India by Vaibhav Purandare हिटलर आणि भारत-वैभव पुरंदरे, जी.बी.देशमुख
Hitler & India by Vaibhav Purandare हिटलर आणि भारत-वैभव पुरंदरे, जी.बी.देशमुख
Couldn't load pickup availability
Hitler & India by Vaibhav Purandare, G B Deshmukh हिटलर आणि भारत - वैभव पुरंदरे, जी.बी.देशमुख
हिटलर - जगात सर्वत्र अत्यंत तिरस्कारानं उच्च्चारल्या जाणारं नाव – भारतीय उपखंडात मात्र काही वेळा हा गैरसमज पाहायला मिळतो की फ्युहरर हा भारतीयांचा मित्र होता. पत्रकार वैभव पुरंदरेंना जाणवलं की या जर्मन हुकूमशहानं स्वत:च्या लिखाणात भारताविषयी त्याचं खरं मत बेधडकपणे मांडून ठेवलेलं असूनही या विषयी भारतीय जनमानसात घोर अज्ञान आहे. ही उणीव भरून काढण्याच्या निकडीतून त्यांना जर्मनी, भारत आणि इतर जागची अभिलेखागारं खंगाळून काढण्याची प्रेरणा मिळाली. हिटलरची भारत देश आणि इथल्या लोकांबद्दलची धारणा, ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्यांनी केलेल्या संघर्षाविषयी त्याची मतं आणि भारताचा इतिहास, संस्कृती आणि सभ्यते विषयी त्याचा अभिप्राय ह्यांचं समर्पक विश्लेषण या पुस्तकात आहे. या शिवाय हे पुस्तक नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांची तिसर्या साम्राज्याशी झालेली गुंतागुंत, नाझी जर्मनीत राहिलेल्या इतर भारतीयांचे अनुभव, हिटलरद्वारे हिमालयात ‘शुद्ध रक्ताचे आर्यन’ शोधण्यासाठी चालवली गेलेली मोहीम आणि या संदर्भातील अनेक अप्रचलीत घटनांवरदेखील प्रकाश टाकतं.
Vaibhav Purandare | G B Deshmukh | Mehta Publishing House | Latest Edition | Marathi |
Share
