Akshargranth
Vaya Gelela Por By Prof. Dr. S. S. Sonawane वाया गेलेलं पोर - डॉ एस एस सोनावणे
Vaya Gelela Por By Prof. Dr. S. S. Sonawane वाया गेलेलं पोर - डॉ एस एस सोनावणे
Couldn't load pickup availability
Vaya Gelela Por वाया गेलेलं पोर | Prof. Dr. S. S. Sonawane | प्रा. डॉ. एस. एस. सोनवणे
‘वाया गेलेलं पोर’, या तीन शब्दांचा माझ्या मनावर सखोल परिणाम झाला. माझ्या उपद्व्यापी स्वभावामुळे मला कायम हिणवलं जायचं. मी आयुष्यात चांगलं काहीतरी करू शकेन की नाही, याविषयी अनेकांच्या मनात शंका होती; पण जे लोक पूर्वी माझी अवहेलना करायचे तेच आज आदराने मला ‘सर’ असे संबोधतात. हे कसं घडलं, हेच या पुस्तकातून आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
कोणतीही व्यक्ती जन्मतःच उज्वल भविष्य घेऊन जन्माला येत नाही किंवा कोणतीही सटवाई वगैरे माणसाचं भविष्य लिहीत नाही, तर स्वतः माणूसच आपल्या विचारांच्या आणि आत्म विश्वासाच्या जोरावर बळकट बनतो. यासाठी गरज आहे फक्त प्रामाणिक प्रयत्नांची.
ठेच लागली म्हणून पाय मागे घेणारे खूप भेटतील; परंतु त्या खडतर मार्गावर घट्ट पाय रोवून जो पुढे मार्गक्रमण करतो, तोच आपलं भविष्य उत्तम घडवू शकतो.
सगळ्यांप्रमाणे मलाही आयुष्यात असंख्य अडचणी, संकटे आलीत; पण त्यांच्यासमोर नतमस्तक न होता त्यावर आरूढ होऊन मी ज्याप्रकारे यशाचा पाठलाग केला, माझे तेच अनुभव या आत्मकथनात मांडले आहेत.
ज्याच्या पंखात बळ असतं त्याला उडण्यासाठी अख्खं आकाश मोकळं असतं. या पुस्तकात मांडलेले माझे अनुभव एखाद्याला जगण्याची प्रेरणा देऊन जिंकण्याची ऊर्जा निर्माण करतील एवढीच माफक अपेक्षा.
Share
