Akshargranth
Yoga Also for the Godless Marathi Edition by Sri M, Translator : Shrirang Patwardhan
Yoga Also for the Godless Marathi Edition by Sri M, Translator : Shrirang Patwardhan
Couldn't load pickup availability
'योगशास्त्र' हे भारतात उदयास आले असले, तरी योगाभ्यासाचा सराव करण्यासाठी हिंदू असणे गरजेचे नाही. ही योगाभ्यासकांसाठी समाधानाची बाब आहे. प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू श्री एम यांनी 'योगा ऑल्सो फॉर गॉडलेस' या पुस्तकातून हेच अधोरेखित केले आहे.
कोणी कुठल्याही धर्माचे असणे किंवा त्यांचा देवावर विश्वासही नसणे या गोष्टी एखाद्याला योगी होण्यात अडथळा आणू शकत नाहीत. नास्तिकांनाही उपयोगी ठरणारे योगशास्त्र म्हणजे हे पुस्तक!
योगाभ्यास सरावातून आस्तिकाप्रमाणे नास्तिकही परमानंद व आत्मज्ञानाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो, हेच यात नमूद केले आहे.
पतंजलींच्या योगसूत्रांवर श्री एम यांनी केलेल्या सखोल अभ्यासावर आधारित असलेले हे पुस्तक म्हणजे सिद्धान्त व प्रत्यक्ष सराव यांविषयी क्रमवार माहिती देणारी मार्गदर्शिकाच आहे.
श्वास, शरीर व आसने या अत्यंत गुंतागुंतीच्या कल्पना श्री एम यांनी स्पष्ट व सुबोध भाषा आणि योगासनांच्या छायाचित्रांच्या मदतीने संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगितल्या आहेत.
योगाभ्यास करणारे व त्याचबरोबर नवोदितांसाठीही हे उपयुक्त आहे.
Share
