Akshargranth
Yugpravartak Chatrapati युगप्रवर्तक छत्रपती PREBOOKING
Yugpravartak Chatrapati युगप्रवर्तक छत्रपती PREBOOKING
Couldn't load pickup availability
Yugpravartak Chatrapati युगप्रवर्तक छत्रपती by Narhar Kurundkar नरहर कुरुंदकर
पुस्तक १५ ऑगस्ट पासून उपलब्ध
भारतीय इतिहासातले मध्ययुग हे इस्लामच्या वर्चस्वाचे युग आहे. या आक्रमकांच्या टोळधाडीपुढे इथल्या हिंदू मनाला शतकानुशतके चिघळत वाहणाऱ्या जखमा करणारे अनेक प्रसंग घडले आहेत. तर दुसरीकडे ज्याच्या आधारे ताठ मानेने उभे रहावे, ज्याची रोमहर्ष जयगाथा उल्लासाने घोषित करावी,असे एकच स्थळ या युगात आहे. ते स्थळ म्हणजे 'शिवाजी'. इतिहासातल्या या नवख्या घटनेचे अवलोकन करून त्याचा रहस्यभेद करणारा ग्रंथ म्हणजे 'युगप्रवर्तक छत्रपती'.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाचा अभ्यास म्हणजे जनतेत प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या एका चारित्र्यवान युगप्रवर्तक नेत्याचा अभ्यास होय. हा अभ्यास करताना शिवचरित्रात जागोजागी जयगाथांची मालिका आहे तसेच काही वादस्थळे आहेत, इतिहास लिखाणाचे प्रवाह आहेत, बलिदानाची सांस्कृतिक प्रेरणा आहे, जनतेची ध्येयवेडी निष्ठा आहे. अशा अनेक विषयांचा परामर्श घेणारे नरहर कुरुंदकरांचे दुर्मिळ लेख एकत्रित स्वरूपात उपलब्ध करणारा हा ग्रंथ आहे.
Share
